Join us  

Rilee Rossouw, ENG vs SA 2nd T20I : ६ वर्षांनंतर दणक्यात कमबॅक! रिली रोसोवूचे ४ धावांनी शतक हुकले, पठ्ठ्याने १५ चेंडूत ७० धावा चोपल्या

ENG vs SA 2nd T20I : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त खेळ केला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 7:51 AM

Open in App

ENG vs SA 2nd T20I : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त खेळ केला. ६ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या आफ्रिकेच्या रिली रोसोवूने ( Rilee Rossouw ) इंग्लंडच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. २० षटके संपल्यामुळे त्याला ४ धावांनी शतक करता नाही आले. त्याने १५ चेंडूवर ७० धावांचा पाऊस पाडून आफ्रिकेला २०० पार पोहोचवलं.

क्विंटन डी कॉक १५ धावा करून माघारी परतल्यावर रिझा हेंड्रीक व रोसोवू यांनी दमदार फटकेबाजी केली. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी ७१ धावा जोडल्या. रिझा ३२ चेंडूवर ३ चौकार व २ षटकार मारून ५३ धावांवर बाद झाला. जॉनी बेअरस्टोने अफलातून झेल टिपला  त्यानंतर रोसोवूचे वादळ घोंगावले. १२ व्या षटकापासून त्याने तूफान फटकेबाजी केली.

रोसोवूने ५५ चेंडूत नाबाद ९६ धावा केल्या. १० चौकार व ५ षटकार अशा ७० धावा तर त्याने १५ चेंडूतच कूटल्या. आफ्रिकेने ३ बाद २०७ धावा केल्या.  आफ्रिकेच्या खेळाडूची इंग्लंड विरुद्धची ट्वेन्टी-२० तील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी रॅसी व्हॅन डर ड्युसनने शारजात नाबाद ९४ धावा केल्या होत्या. कार्डिफवरील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नावावर करताना रोसोवूने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचा ९० ( वि. इंग्लंड, २०१५) धावांचा विक्रम मोडला. 

टॅग्स :द. आफ्रिकाइंग्लंडटी-20 क्रिकेट
Open in App