ENG vs WI : नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ४१६ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजची पाळी आली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने अकराव्या स्थानी येत जबरदस्त षटकार ठोकला. शामरचा हा षटकार इतका जबरदस्त होता की स्टेडियमचे छत तुटले आणि फरशा तुटून प्रेक्षकांच्या अंगावर पडल्या. प्रेक्षकांनी कसेतरी आपले डोके वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पहिल्या डावात केलेल्या ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ४५७ धावा केल्या आणि ४१ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ३ बाद २४८ धावा केल्या होत्या आणि त्यांच्याकडे २०७ धावांची आघाडी होती. त्याआधी वेस्ट इंडिजने ८४ धावांत तीन विकेट गमावल्या आणि नंतर नऊ विकेट गमावून ३८६ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर अकराव्या स्थानी शमर जोसेफ फलंदाजीला आला आणि त्याने असा फटका मारला की, प्रेक्षक जीव वाचवण्यासाठी धावू लागले.
इंग्लंडच्या गस ॲटकिन्सनने टाकलेल्या ओव्हरमध्ये शमरने आक्रमक खेळी खेळली. दुसऱ्या चेंडूवर त्याने डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार मारला. त्यानंतर चौथ्या चेंडू ॲटकिन्सनने शॉर्ट पिच टाकला. त्यावेळी शमरने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या चेंडूवर एक शक्तिशाली षटकार मारला आणि चेंडू छताला लागला. चेंडू आदळल्यानंतर छतावरील फरशा तुटून खाली बसलेल्या प्रेक्षकांवर पडू लागल्या. मात्र तिथे बसलेल्या लोकांनी मोठ्या कष्टाने स्वतःला दुखापत होण्यापासून वाचवले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी फरशीचे तुटलेले तुकडे गोळा केले. शमरच्या जोरदार फटकेबाजीमुळे कोणत्याही प्रेक्षकाला दुखापत झाली नाही. षटकातील पाचव्या चेंडूवर शमरने चौकार लगावला आणि एकूण १६ धावा केल्या.
शमरने ३३ धावांची खेळी केली. त्याने २७ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. जोशुआ दा सिल्वा सोबत दहाव्या विकेटसाठी ७१ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर शमरला मार्क वुडने बाद केले. त्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव ४५७ धावांवर आटोपला.
Web Title: ENG vs WI Shamar Joseph stunning six shook the roof of the stadium video viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.