ENG Women vs Indian Women : भारतीय महिला संघाला इंग्लंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका जिंकण्याची ऐतिहासिक संधी होती. पण, फॉर्मात असलेल्या इंग्लंडच्या महिला संघानं वन डे पाठोपाठ ट्वेंटी-२० मालिकेतही विजय मिळवला. इंग्लंडनं तिसऱ्या व निर्णायक ट्वेंटी-२० सामन्यात ८ विकेट्स राखून विजय मिळवताना मालिका २-१ नं खिशात घातली. इंग्लंडनं जरी बाजी मारली असली तरी भारताच्या स्मृती मानधनानं ( Smriti Mandhana ) सर्वांची वाहवाह मिळवली. स्मृतीनं अर्धशतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १३ वेळा ५०+ धावा करणाऱ्या डावखुऱ्या महिला फलंदाजांमध्ये स्मृतीनं अव्वल स्थान पटकावले. ( Most 50+ scores by a Left handed batter in T20Is)
टीम इंडियाचा कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला खेळाडू कोण ते समजलं; यूरो स्पर्धा पाहणं महागात पडलं?
दुसऱ्या ट्वेंटी-२०त विजय मिळवून टीम इंडियानं मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यामुळे तिसऱ्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. शेफाली वर्मा ( ०) व हर्लीन देओल ( ६) झटपट माघारी परतल्या असताना स्मृतीनं एका बाजूनं खिंड लढवण्याचं काम केलं. तिला कर्णधार हरमनप्रीत कौर हिची साथ मिळाली. कौरनं २६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३६ धावा केल्या. रिचा घोषनं २० धावा करून संघाच्या धावसंख्येत हातभार लावला. स्मृतीनं ५१ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारासह ७० धावांची खेळी करून संघाला ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारून दिली.
इंग्लंडच्या महिला संघानं दोन विकेट्स गमावत हे लक्ष्य पार केले. दीप्ती शर्मा इंग्लंडची सलामीवीर टॅमी बीयूमोंट ( ११) हिला बाद करून धक्का दिला, परंतु डॅनी वॅट व नॅट श्वीव्हर यांनी विजय साकारला. डॅनीनं ५६ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ८९ धावा केल्या. नॅटनं ३६ चेंडूंत ४२ धावा केल्या. इंग्लंडनं १८.४ षटकांत २ बाद १५४ धावा करून विजय पक्का केला.
Web Title: ENG Women beat Indian Women by 8 wickets & won the series by 2-1; Smriti Mandhana scored 70 runs in 51 balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.