मँचेस्टर : काही खेळाडूंच्या दुखापतींनी ग्रस्त असलेल्या इंग्लंडला मंगळवारी तुलनेत कमुकवत अफगाणिस्तानविरुद्ध लढत द्यायची आहे. हा सामना जिंकून उपांत्य फेरीची दावेदारी भक्कम करण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल.
इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गन कंबरेच्या दुखण्यामुळे त्रस्त आहे. सलामीवीर जेसन रॉय याच्या मांसपेशी दुखावल्या असल्याने तो मंगळवारी आणि शुक्रवारच्या सामन्यात खेळणार नाही. मॉर्गन फिट नसल्यास उपकर्णधार जोस बटलर नेतृत्व करेल. इंग्लंडची राखीव फळी भक्कम असल्याने टॉम कुरेन आणि मोईन अली हे खेळाडू संघात योगदान देऊ शकतात. पाककडून पराभूत झाल्यानंतर इंग्लंडने तिन्ही विभागात सुधारणा घडवून आणली आहे.
दुसरीकडे अफगाणिस्तानला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. दुसऱ्यांदा विश्वचषकात खेळत असलेला हा संघ द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका व न्यूझीलंडकडून पराभूत झाला. लंकेला मात्र या संघाने बरेच झुंजवले. अफगाणिस्तानची चिंता त्यांची फलंदाजी आहे. द. आफ्रिकेविरुद्ध दमदार सुरुवात केल्यानंतरही मोठी खेळी करण्यात हा संघ अपयशी ठरला होता. राशिद खान याचा अपवाद वगळता अन्य खेळाडू कामगिरीत सातत्य दाखविण्यात अपयशी ठरले. खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहिल्यास राशिदसह मोहम्मद नबी यांची भूमिका मोलाची ठरणार आहे. (वृत्तसंस्था)
हेड-टू-हेड
दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत विश्वचषकामध्ये केवळ एक सामना झाला असून त्यामध्ये इंग्लंडने विजय मिळवला आहे.
विश्वचषकामध्ये इंग्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध १०१, तर अफगाणिस्तानने इंग्लंडविरूद्ध १११ धावा केल्या आहेत. हीच या दोन्ही संघांची सर्वाेच्च व नीचांकी धावसंख्या आहे.
डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे इंग्लंडला १०१ धावांचे लक्ष्य होते. ते पार करून इंग्लंडने बाजी मारली.
Web Title: England aim to set Afghanistan a semi-final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.