Join us  

तुम्ही मॅचमध्ये काय केलं ते लोक विसरतात! संघातून वगळताच स्टार क्रिकेटरनं घेतली निवृत्ती

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याने आपल्या मनातील खदखदही व्यक्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 12:05 PM

Open in App

इंग्लंडचा स्टार ऑल राउंडर मोईन अली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून  निवृत्ती घेतली आहे. नुकतेच इंग्लंड क्रिकेट बोर्डानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी संघ निवड केली होती. यात मोईन अली खानला स्थान मिळाले नाही. संघातून वगळल्यानंतर त्याने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतला. 

निवृत्तीवर काय म्हणाला मोईन अली

मोईन अली हा जवळपास दशकभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होता. २०२४ च्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत तो अखेरचा मैदानात उतरला होता. डेली मेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोईन अली खान याने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.. तो म्हणाला की,

मी ३७ वर्षांचा आहे. या महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी मला संघात स्थान मिळाले नाही. मी इंग्लंडकडून खूप क्रिकेट खेळलो. आता नव्या पिढीसाठी जागा मोकळी करण्याची वेळ झालीये. बोर्डाकडूनही मला तसं सांगण्यात आलं होते. मी माझ काम थांबवतो. सामन्यात तुम्ही केलेला प्रभावी खेळ लोक विसरतात. २०-३० धावांची खेळीही महत्त्वाची असते, असेही तो म्हणाला. 

 

इयॉन मॉर्गननं अधिक संधी दिली

पहिल्यांदा इंग्लंडकडून खेळताना तुम्ही किती सामने खेळणार ते माहिती नसते. जवळपास ३०० सामने खेळण माझ्यासाठी खूप मोठी आणि अभिमानास्पद वाटते. सुरुवातीच्या काळात मी कसोटीच्या अवती-भोवती फिरत होतो.  इयॉन मॉर्गनच्या खांद्यावर इंग्लंड संघाची धूरा आल्यावर त्याने वनडेत संधी दिली.  टेस्टमध्ये एक वेगळी मजा होती पण तिथं म्हणावी तशी संधी मिळाली नाही, असेही तो म्हणाला आहे. 

मोईन अलीची कारकिर्दीतील कामगिरी

२०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोईन अलीनं ऑल राउंडरच्या रुपात आपली खास छोप सोडली.  त्याने इंग्लंडकडून ६८ कसोटी सामने, १३८ एकदिवसीय सामने आणि ९२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले. त्याच्या खात्यात तिन्ही प्रकारात मिळून ८ शतके आणि २८ अर्धशतकांसह ६६७८ धावा जमा आहेत. याशिवाय त्याने ३६६ विकेटही घेतल्या आहेत.  

टॅग्स :इंग्लंड