Join us  

Moeen Ali Retirement: मोठी बातमी! वनडे अन् ट्वेन्टी-20वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कसोटीतून निवृत्तीच्या तयारीत

Moeen Ali Retirement: इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोइन अली (Moeen Ali) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 11:52 AM

Open in App

Moeen Ali Retirement: इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोइन अली (Moeen Ali) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच मोइन अली याची अधिकृत घोषणा करणार आहे. इएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार ३४ वर्षीय मोइन अली यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची कल्पना इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड (Chris Silverwood) आणि कर्णधार ज्यो रूट (Joe Root) याला दिली आहे. 

भारतीय ट्वेन्टी-२० संघात चहलला जागा न दिल्यानं सेहवाग संतापला, म्हणाला...'स्पष्टीकरण द्या!'

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हिच योग्य वेळल असल्याची भावना मोइन अलीनं बोलून दाखवली आहे. आगामी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी निवड आणि त्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचं मोइन अलीनं ठरवलं आहे. सध्या मोइन अली यूएईमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करत आहे. मोइन अली फ्रँचायझी क्रिकेट, इंग्लंडकडून वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट यापुढेही खेळणार आहे. तर फर्स्टक्लास क्रिकेटमध्येही मोइन अली खेळण्याचीही शक्यता आता कमीच आहे. 

विराट कोहलीनं RCBसाठी सामना जिंकला, पण मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचं मनही जिंकलं, Video

मोइन अलीनं इंग्लंडकडून आतापर्यंत ६४ सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं असून यात २९१४ धावा, ५ शतकं आणि १४ अर्धशतकं ठोकली आहेत. तर १९५ विकेट्स देखील मिळवल्या आहेत. 

टॅग्स :इंग्लंडचेन्नई सुपर किंग्स
Open in App