SAT20 League vs ILT20 League: इंडियन प्रीमिअर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग, बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग, बांगलादेश प्रीमिअर लीग, श्रीलंका प्रीमिअर लीग... पाठोपाठ आता यूएई आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीग आणि दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीग येत आहे. आयपीएलमधील बऱ्याच फ्रँचायझींनी दक्षिण आफ्रिकेत होऊ घातलेल्या लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स यांनी आफ्रिकन लीगसोबतच यूएईत होणाऱ्या लीगमध्येही फ्रँचायझी खरेदी केल्या आहेत. MI, CSK, KKR, DC यांनी आपापले संघही जाहीर केलेत. पण, चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढवणारी गोष्ट समोर आली आहे. CSK चा प्रमुख अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या व यूएईत होणाऱ्या लीगमध्ये खेळणार असल्याचे समोर आले आहे आणि ते शक्य नाही. कारण दोन्ही लीग एकाच वेळी होणार आहेत.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचे नाव दोन्ही लीगमधील वेगवेगळ्या संघांत आहे. CSK ने आफ्रिकेत होणाऱ्या लीगमधील जोहान्सबर्ग फ्रँचायझी खरेदी केली आहे आणि जोहान्सबर्ग सुपर किंग्स ( Johannesburg Super Kings ) असे त्यांनी नावही जाहीर केले. मोईन अलीला CSKने या लीगसाठी करारबद्ध केले. त्याचवेळी यूएईतील लीगमध्ये शाहजाह वॉरियर्स संघाने जाहीर केलल्या खेळाडूंच्या यादीत मोईन अलीचे नाव दिसले. CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले आहे. CSK ने आफ्रिका ट्वेंटी-२० लीगसाठी अलीला ४ लाख अमेरिकन डॉलरमध्ये करारबद्ध केले आहे. या स्पर्धेतील तो दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. ''आम्हाला पण आताच समजले आहे आणि आम्ही त्याची माहिती घेतोय,''असे विश्वनाथन यांनी सांगितले.
नेमकं वादाचा मुद्दा काय?
दक्षिण आफ्रिका लीगसाठी करारबद्ध झालेले खेळाडू यूएईतील आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळू शकत नाही किंवा उलटं.. कारण दोन्ही लीग जानेवारी-फेब्रुवारीच्या विंडोमध्ये होणार आहेत. हाती आलेल्या वृत्तानुसार मोईन अलीने यूएईल ट्वेंटी-२०लीगमध्ये खेळणार असल्याचे फ्रँचायझीला कळवले आहे आमि त्यामुळे तो त्या कालावधीत इंग्लंडकडून खेळणार नाही. त्याचवेळी तो आफ्रिकेतील CSK फ्रँचायझीकडूनही खेळणार नाही, हेही स्पष्ट होतेय.
जोहान्सबर्ग सुपर किंग्सचा संघ - फॅफ ड्यू प्लेसिस, मोईन अली, महिश तिक्षाणा, रोमारिओ शेफर्ड, गेराल्ड कोएत्झी
Web Title: England all-rounder Moeen Ali signs up for both Sharjah Warriors ILT20 League& Johannesburg SAT20 League, Chennai Super Kings CEO very miffed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.