आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आता काही दिवसच शिल्लक असताना मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाली असून त्यानं थेट वर्ल्ड कप संघातून माघार घेतली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन यानं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पाठ दुखावली आहे. ( Surrey and England all-rounder Sam Curran has been ruled out of the ICC Men’s T20 World Cup with a lower back injury). त्याच्या जागी इंग्लंडनं टॉम कुरनला संघात घेतले आहे. टॉम हा सॅमचा भाऊ आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या लढतीत सॅमला ही दुखापत झाली आणि सामन्यानंतर केलेल्या स्कॅनमध्ये हे स्पष्ट झाले, असे इंग्लंव वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) सांगितले. पुढील उपचारासाठी तो काही दिवस यूएईतह राहणार आहे. पुढील आठवड्यात ECBची वैद्यकिय टीम त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी करेल. इंग्लंडचा संघ आज मस्कत येथे दाखल झाला आहे आणि १६ ऑक्टोबरपर्यंत ओमान येथे थांबणार आहे. त्यानंतर दुबईला स्पर्धेसाठी दाखल होईल.
सॅमसह जोफ्रा आर्चर व बेन स्टोक्स या प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाला प्रकर्षानं जाणवणार आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आर्चर व स्टोक्स यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. इंग्लंडचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला २०१६च्या वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व पात्रता फेरीतून आलेल्या दोन संघांविरुद्ध ते खेळतील.
इंग्लंडचा संघ - इंग्लंडचा संघ - इऑन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, आदिल रशिद, जेसन रॉय, डेव्हिड विले, ख्रिस वोक्स, मार्क वूड ( England squad in full: Eoin Morgan (Middlesex, captain), Moeen Ali (Worcestershire), Jonathan Bairstow (Yorkshire), Sam Billings (Kent), Jos Buttler (Lancashire), Tom Curran (Surrey), Chris Jordan (Sussex), Liam Livingstone (Lancashire), Dawid Malan (Yorkshire), Tymal Mills (Sussex), Adil Rashid (Yorkshire), Jason Roy (Surrey), David Willey (Yorkshire), Chris Woakes (Warwickshire), Mark Wood (Durham))
Web Title: England all-rounder Sam Curran out of T20 World Cup due to back injury and replaced by brother Tom Curran
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.