इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातली कसोटी मालिका सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेटला सुरुवात होत असल्यानं, सर्वच उत्सुक आहेत. 8 जुलैला सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी दोन्ही संघ सराव सामने खेळत आहेत. इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या विंडीजच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आणि सर्व अहवाल निगेटिव्ह आले. इंग्लंडच्या खेळाडूंचेही अहवाल निगेटिव्ह आले होते, परंतु बुधवारी मध्यरात्री सराव सामन्यात त्यांच्या गोलंदाजाची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानं स्वतःला रुममध्ये आयसोलेट केले आहे. आता त्याची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या चमूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंग्लंडने त्यांच्या खेळाडूंची विभागणी टीम जोस बटलर आणि टीम बेन स्टोक्स अशा दोन संघात केली. त्यांच्या तीन दिवसीय सराव सामना सुरू आहे. पण, बुधवारी मध्यरात्री इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याची प्रकृती अचानक बिघडली. आता त्याने सराव सामन्यातून माघार घेतली आहे. त्यानं स्वतःला रुममध्ये सेल्फ आयसोलेट केलं आहे. कुरन हा बटलरच्या संघाकडून खेळला होता. त्यानं 15 धावा करून माघारी परतला.
सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी तो आजारी पडला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार 22 वर्षीय कुरन हा गुरुवारी दुपारपर्यंत तंदुरुस्त वाटत होता. संघाचे डॉक्टर कुरनच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत आणि त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे.