भारताविरुद्धच्या ५ कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला १६ सदस्यीय संघ, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक 

England Men squad for India Test tour announced - इंग्लंडचा संघ पुढील वर्षी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:42 PM2023-12-11T17:42:56+5:302023-12-11T17:43:48+5:30

whatsapp join usJoin us
England announce 16-man squad for 5 Tests against India, Check full schedule | भारताविरुद्धच्या ५ कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला १६ सदस्यीय संघ, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक 

भारताविरुद्धच्या ५ कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला १६ सदस्यीय संघ, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England Men squad for India Test tour announced - इंग्लंडचा संघ पुढील वर्षी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने आज १६ सदस्यीय तगडा संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये जलदगती गोलंदाज गुस एटकिन्सन, फिरकीपटू टॉम हार्टली व शोएब बशीर या अनकॅप्ड खेळाडूंना संधी दिली गेली आहे. 


एटकिन्सनने मागील समरमधअये कौंटी चॅम्पियनशीपच्या ५ सामन्यांत २० विकेट्स घेतल्या होत्या आणि या कामगिरीच्या जोरावर सरे क्लबने सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरले होते. हार्टली व बशीर हे मागील महिन्यात यूएई येथे इंग्लंडच्या संघाकडून सरावासाठी गेले होते. तिथे त्यांनी कसोटी संघाचा उप कर्णधार ओली पोप व जॅक लीच यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. रेहान अहमद याचेही कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. मागील डिसेंबर महिन्यात पाकिस्तानविरुद्ध पदार्पणात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या.  

Image
इंग्लंडचा संघ - 
बेन स्टोक्स ( कर्णधार)
रेहान अहमद
जेम्स अँडरसन 
गुस एटकिन्सन  
जॉनी बेअरस्टो 
शोएब बशीर  
हॅरी ब्रूक 
झॅक क्रॅवली 
बेन डकेट
बेन फोक्स 
टॉम हार्टली
जॅक लिच
ऑली पोप 
ऑल रॉबिन्सन 
जो रूट 
मार्क वूड  

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी - २५ ते २९ जानेवारी, हैदराबाद
  • दुसरी कसोटी - २ ते ६ फेब्रुवारी, व्हायझॅक
  • तिसरी कसोटी - १५ ते १९ फेब्रुवारी, राजकोट
  • चौथी कसोटी - २३ ते २७ फेब्रुवारी, रांची
  • पाचवी कसोटी - ७ ते ११ मार्च, धर्मशाला  


 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ही मालिका असल्याने दोन्ही संघ गुण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. भारतीय संघ सध्या १६ गुण व ६६.६७ टक्केवारीसह तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड ९ गुण व १५ टक्क्यांसह सातव्या क्रमांकावर आहे. भारताने दोन वेळा WTC च्या फायनलमध्ये धडक मारली आहे, पंरतु त्यांना अनुक्रमे न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली आहे. 

Web Title: England announce 16-man squad for 5 Tests against India, Check full schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.