PAK vs ENG T20I : भारतापाठोपाठ पाकिस्तानही हरला, ७५ धावांत ७ विकेट पडल्याने घोळ झाला; इंग्लंडने सामना जिंकला

Pakistan vs England 1st T20I : भारत व पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकाच दिवशी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पराभूत झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:57 PM2022-09-20T23:57:33+5:302022-09-20T23:57:50+5:30

whatsapp join usJoin us
England beat Pakistan by 6 wickets in the first T20 - terrific from Luke Wood, Hales and Brook, host lost 7 wickets in 75 runs in last 11 overs   | PAK vs ENG T20I : भारतापाठोपाठ पाकिस्तानही हरला, ७५ धावांत ७ विकेट पडल्याने घोळ झाला; इंग्लंडने सामना जिंकला

PAK vs ENG T20I : भारतापाठोपाठ पाकिस्तानही हरला, ७५ धावांत ७ विकेट पडल्याने घोळ झाला; इंग्लंडने सामना जिंकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan vs England 1st T20I : भारत व पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकाच दिवशी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पराभूत झाले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतावर ४ विकेट्स व ४ चेंडू राखून विजय मिळवला, तर इंग्लंडने यजमान पाकिस्तानवर ६ विकेट्स व ४ चेंडू राखून मात केली. मोहम्मद रिझवानने ६८ धावांची खेळी करताना सर्वात कमी ५२ डावांत ट्वेंटी-२०त २०००+ धावा करण्याच्या बाबर आजमच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, त्याची विक्रमी खेळी व्यर्थ गेली. ॲलेक्स केरी व हॅरी ब्रुक यांनी दमदार खेळ करताना इंग्लंडला ७ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली. तत्पूर्वी, ल्युक वूड व आदील राशिद यांनी गोलंदाजीत कमाल केली.


प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ७ बाद १५८ धावा केल्या. मोहम्मद रिझवान व कर्णधार बाबर आजम यांनी पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. पण, १०व्या षटकात बाबर  ( ३१) बाद झाला अन् पाकिस्तानचा डाव गडगडला. शेवटच्या ११.३ षटकांत पाकिस्तानने ७ फलंदाज ७५ धावांवर गमावल्याने इंग्लंडसमोर माफक लक्ष्य उभे राहिले. रिझवानने ४६ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६ ८ धावा केल्या. इफ्तिकार अहमद २८ धावांवर बाद झाला. अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. वूडने २४ धावांत ३, तर राशिदने २७ धावांत २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात फिल सॉल्ट ( १०), डेविड मलान ( २०) व बेन डकेट ( २१) हे माघारी परतल्यानंतर सलामीवर ॲलेक्स हेल्स व हॅरी ब्रूक यांनी दमदार खेळ केला. हेल्सने ४० चेंडूंत ७ चौकारांसह ५३  धावा केल्या. ब्रूकने २५ चेंडूंत ७  चौकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा केल्या. इंग्लंडने १९.२ षटकांत ४ बाद १६० धावा करून विजय मिळवला. 

Web Title: England beat Pakistan by 6 wickets in the first T20 - terrific from Luke Wood, Hales and Brook, host lost 7 wickets in 75 runs in last 11 overs  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.