Pakistan vs England 1st T20I : भारत व पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकाच दिवशी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पराभूत झाले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतावर ४ विकेट्स व ४ चेंडू राखून विजय मिळवला, तर इंग्लंडने यजमान पाकिस्तानवर ६ विकेट्स व ४ चेंडू राखून मात केली. मोहम्मद रिझवानने ६८ धावांची खेळी करताना सर्वात कमी ५२ डावांत ट्वेंटी-२०त २०००+ धावा करण्याच्या बाबर आजमच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, त्याची विक्रमी खेळी व्यर्थ गेली. ॲलेक्स केरी व हॅरी ब्रुक यांनी दमदार खेळ करताना इंग्लंडला ७ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली. तत्पूर्वी, ल्युक वूड व आदील राशिद यांनी गोलंदाजीत कमाल केली.
प्रत्युत्तरात फिल सॉल्ट ( १०), डेविड मलान ( २०) व बेन डकेट ( २१) हे माघारी परतल्यानंतर सलामीवर ॲलेक्स हेल्स व हॅरी ब्रूक यांनी दमदार खेळ केला. हेल्सने ४० चेंडूंत ७ चौकारांसह ५३ धावा केल्या. ब्रूकने २५ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा केल्या. इंग्लंडने १९.२ षटकांत ४ बाद १६० धावा करून विजय मिळवला.