Join us  

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरनं आधीच केली होती भारतातील लॉकडाऊन वाढण्याची भविष्यवाणी; ट्विट व्हायरल 

देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी आणखी 21 दिवसांनी वाढवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 3:32 PM

Open in App

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 19लाख 26,235 वर पोहोचली आहे. त्यापैली 1 लाख 19, 724 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर 4 लाख 52, 326 रुग्ण बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत 10541 कोरोना रूग्ण आढळले आहेत आणि 358 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी आणखी 21 दिवसांनी वाढवला आहे. मोदींनी मंगळवारी घोषणा केली आणि त्यानुसार 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. पण, याची भविष्यवाणी इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरनं आधीच केली होती. त्याचे जुने ट्विट्स व्हायरल होत आहेत. याआधी मोदींनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील लाईट्स बंद करून मेणबत्ती लावण्याचं आवाहन केलं होतं. त्याही वेळेस जोफ्राच्या ट्विट्सला या घटनेशी जोडण्यात आले होते. जोफ्रानं सहा वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटमध्येही अशाच परिस्थितीची भविष्यवाणी केली होती आणि लोकांनी त्याचा संबंध सध्याच्या परिस्थितीशी जोडून जोफ्राला देवाची उपाधी दिली आहे. 2014मध्ये जोफ्रानं ट्विट केलं होतं की,''पळायलाही जागा राहणार नाही, असा दिवस येईल.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक; Corona Virus मुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू जाफर सर्फराजचा मृत्यू

भारतातील लोकांना कचऱ्यातून अन्न निवडून खाताना पाहतोय; शाहिद आफ्रिदीनं ओलांडल्या मर्यादा

युवराज सिंगला मदत केली, तेव्हा पाकिस्तानातून टीका झाली नाही; शाहिद आफ्रिदीचा भारतीयांना टोमणा

Video: बेबी, मै क्या हू तेरा? हार्दिक पांड्यानं प्रेयसी नताशाला विचारला सवाल अन्...

Video : फुकट काम करेन, फक्त पाकिस्तानातील लोकांना रेशन पुरवा; शाहिद आफ्रिदीचे आवाहन

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याइंग्लंडनरेंद्र मोदी