Join us  

इंग्लंडचा कर्णधार जो रूट IPLमध्ये खेळणार नाही, ECBचे संकेत

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि अॅशेस मालिकेपूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी याकरिता इंग्लंडचा कर्णधार जो रूट पुढील वर्षी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 2:10 PM

Open in App

मुंबई - आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि अॅशेस मालिकेपूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी याकरिता इंग्लंडचा कर्णधार जो रूट पुढील वर्षी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणार नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ( ECB) तसे संकेत दिले आहेत. इंग्लंडचा संघ सध्या मायभूमीत भारतीय संघाविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे आणि त्यानंतर संघ श्रीलंका व वेस्ट इंडीज यांच्याविरूद्ध तिन्ही प्रकारचे क्रिकेट सामने खेळणार आहे.

दरम्यान रूट आणि जोस बटलर यांना बीग बॅश लीगमधील सिडनी थंडर्स क्लबने पहिल्या टप्प्यात खेळण्यासाठी करारबद्ध केले आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी हे दोघं त्या लीगमध्ये खेळणार आहेत. मात्र, अॅशेस मालिका आणि विश्वचषक स्पर्धेसाठी रूट आयपीएलमध्ये खेळणार नाही. 

भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधार रूटला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तीन सामन्यांत त्याला केवळ 142 धावा करता आल्या आहेत. पहिल्या कसोटीतील 80 धावा या त्याच्या मालिकेतील सर्वोत्तम धावा आहेत. भारताने तिसरी कसोटी जिंकून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे आणि त्यामुळे त्यांचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. इंग्लंडला मालिका जिंकायची असल्यास रूटचे फॉर्मात येणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडइंडियन प्रीमिअर लीगक्रिकेटजो रूटक्रीडा