अ‍ॅशेस मालिका : वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाजाला इंग्लंडच्या संघात स्थान नाही

वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अ‍ॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 06:13 PM2019-07-31T18:13:22+5:302019-07-31T18:19:10+5:30

whatsapp join usJoin us
England captain Joe Root has confirmed his side for the first Ashes Test starting at Edgbaston on Thursday | अ‍ॅशेस मालिका : वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाजाला इंग्लंडच्या संघात स्थान नाही

अ‍ॅशेस मालिका : वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाजाला इंग्लंडच्या संघात स्थान नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडनः वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अ‍ॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत. गुरुवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने अंतिम 11 सदस्यीय संघ जाहीर केला. पण, या संघात वर्ल्ड कपमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जोफ्रा आर्चरला संधी मिळालेली नाही. त्याच्यासह सॅम कुरन आणि ऑली स्टोन यांना अंतिम अकरामध्ये स्थान पटकावता आलेले नाही. कर्णधार जो रूटने हा संघ जाहीर केला.

अ‍ॅशेस मालिकेचे जेतेपद सध्या ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यांनी 2017-18ची मालिका 4-0 अशी जिंकली होती. त्यामुळे घरच्या मैदानावर पुन्हा अ‍ॅशेस जिंकण्याचा इंग्लंडचा निर्धार आहे. 

इंग्लंडचे अंतिम अकराः रोरी बर्न्स, जेसन रॉय, जो रूट, जोए डेन्ली, जॉस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन 


अ‍ॅशेस मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी - 1 ते 5 ऑगस्ट, एडबॅस्टन, बर्मिंगहॅम
दुसरी कसोटी - 14 ते 18 ऑगस्ट, लॉर्ड्स, लंडन
तिसरी कसोटी - 22 ते 26 ऑगस्ट, हेडिंग्ली, लीड्स
चौथी कसोटी - 4 ते 8 सप्टेंबर, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी - 12 ते 16 सप्टेंबर, ओव्हल, लंडन

Web Title: England captain Joe Root has confirmed his side for the first Ashes Test starting at Edgbaston on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.