"कोण आला रे?", मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घातक गोलंदाज सामील; पहिलीच झलक चर्चेत!

जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 03:55 PM2023-03-26T15:55:17+5:302023-03-26T15:55:43+5:30

whatsapp join usJoin us
England fast bowler Jofra Archer has joined the Mumbai Indians squad   | "कोण आला रे?", मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घातक गोलंदाज सामील; पहिलीच झलक चर्चेत!

"कोण आला रे?", मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घातक गोलंदाज सामील; पहिलीच झलक चर्चेत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

jofra archer ipl 2023 । मुंबई : जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरूवात 31 मार्चपासून होत आहे. आगामी हंगामातील पहिला सामना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. या हंगामापूर्वी स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

दरम्यान, दुखापतीमुळे मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर असलेला जसप्रीत बुमराह आयपीएलला देखील मुकणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा झटका बसला आहे. मात्र, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आगामी आयपीएलसाठी सज्ज आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्चर संघाच्या ताफ्यात सामील झाल्याची माहिती दिली. खरं तर आर्चर आगामी हंगामात प्रथमच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. दुखापतीच्या कारणास्तव तो आयपीएल २०२२ च्या हंगामात उपलब्ध नव्हता. 

आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल. 

IPL २०२३ साठी मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक - 

  1. २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा. पासून 
  2. ८ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा. पासून
  3. ११ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली - सायंकाळी ७.३० वा. पासून 
  4. १६ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून 
  5. १८ एप्रिल - स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  6. २२ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  7. २५ एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  8. ३० एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  9. ३ मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  10. ६ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी ३.३० वा. पासून 
  11. ९ मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  12. १२ मे - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  13. १६ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स लखनौ, - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  14. २१ मे - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई - दुपारी  ३.३० वा.पासून  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

 

Web Title: England fast bowler Jofra Archer has joined the Mumbai Indians squad  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.