इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून मॅच विनर खेळाडू OUT! युवा खेळाडूला संधी  

England squad for World Cup 2023 : इग्लंडने २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 08:34 PM2023-09-17T20:34:29+5:302023-09-17T20:36:00+5:30

whatsapp join usJoin us
England have named their squad for the World Cup in India, Harry Brook has replaced Jason Roy from the initial squad that was named in August. | इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून मॅच विनर खेळाडू OUT! युवा खेळाडूला संधी  

इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून मॅच विनर खेळाडू OUT! युवा खेळाडूला संधी  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England squad for World Cup 2023 : इग्लंडने २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये हॅरी ब्रूकचा ( Harry Brook)  समावेश करण्यात आला असून जेसन रॉयला ( Jason Roy) वगळण्यात आले आहे. इंग्लंड संघ निवडक ल्यूक राईट म्हणाले, 'आम्ही जो संघ निवडला आहे, तो भारतात जाऊन वर्ल्ड कप जिंकेल, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्याकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणारे दमदार खेळाडू आहेत आणि त्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत क्षमता दाखवून दिली आहे.  संघाच्या ताकदीमुळे आम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागले आहेत. यामुळे जेसन रॉयला वगळण्यात आले आहे.'


इंग्लंड ५ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबाद येथून वर्ल्ड कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. दोन्ही संघ मागील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. इंग्लंड गतविजेता म्हणून मैदानावर उतरेल. २०१९ मध्ये इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला होता. ३३ वर्षीय रॉय २०१९च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याला या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या तात्पुरत्या संघात ठेवण्यात आले होते. पण पाठ दुखीमुळे रॉय न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिका खेळू शकला नाही. त्याच्या गैरहजेरीत डेविड मलान ओपनिंग केली आणि त्याने ३ सामन्यांत ९२.३३च्या सरासरीने २७७ धावा केल्या. अशा परिस्थितीत इंग्लंडने सलामीवीर म्हणून जॉनी बेअरस्टोसह मलानची निवड केली. 


इंग्लंडचा वर्ल्ड कप संघ - जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, लिएम लिव्हिंग्स्टन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रिस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.( England's squad for the World Cup: Jos Buttler (captain), Moeen Ali, Gus Atkinson, Jonny Bairstow, Sam Curran, Liam Livingstone, Dawid Malan, Adil Rashid, Joe Root, Harry Brook, Ben Stokes, Reece Topley, David Willey, Mark Wood, Chris Woakes.) 

Web Title: England have named their squad for the World Cup in India, Harry Brook has replaced Jason Roy from the initial squad that was named in August.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.