ख्राईस्टचर्च : जेम्स विन्से (७६) व मार्क स्टोनमॅन (६०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी तिसºया दिवशी दुस-या डावात ३ बाद २०२ धावांची मजल मारली आणि आपली स्थिती मजबूत केली. इंग्लंडकडे एकूण २३१ धावांची आघाडी असून त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत.त्याआधी, इंग्लंडच्या पहिल्या डावात ३०७ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडचा डाव २७८ धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडतर्फे बीजे वॉटलिंगने ८५, कोलिन ग्रँडहोमने ७२ व टीम साऊदीने ५० धावा केल्या. इंग्लंडतर्फे स्टुअर्ट ब्रॉडने ५४ धावांच्या मोबदल्यात ६ तर जेम्स अँडरसनने ७६ धावांत ४ बळी घेतले.त्यानंतर इंग्लंडने माजी कर्णधार अॅलिस्टर कुकला (१४) लवकर गमावले, पण विन्से व स्टोनमॅन यांनी दुसºया विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. आजचा खेळ थांबला त्यावेळी कर्णधार जो रुट (३०) व डेव्हिड मलान (१९) खेळपट्टीवर होते. विन्सेने कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी केली. त्याला ट्रेंट बोल्टने, तर स्टोनमॅनला टीम साऊदने बाद केले.त्याआधी, ब्रॉड व अँडरसन यांनी एकूण १० बळी घेतले. या मालिकेत तिसºयांदा नव्या चेंडूने मारा करणाºय जोडीने सर्व १० बळी घेतले. बोल्ट व साऊदी यांनी दोन्ही कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात हा पराक्रम केला आहे. वैयक्तिक ७७ धावसंख्येवरुन पुढे खेळताना वॉटलिंगला आज विशेष भर घालता आली नाही. साऊदीने कारकिर्दीत चौथ्यांदा कसोटी अर्धशतक झळकावले. साऊदीने कारकिर्दीत दुसºयांदा सामन्यात पाच बळी व अर्धशतक अशी दुहेरी कामगिरी केली आहे. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध मजबूत स्थितीत
इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध मजबूत स्थितीत
जेम्स विन्से (७६) व मार्क स्टोनमॅन (६०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी तिसºया दिवशी दुस-या डावात ३ बाद २०२ धावांची मजल मारली आणि आपली स्थिती मजबूत केली. इंग्लंडकडे एकूण २३१ धावांची आघाडी असून त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 1:37 AM