लखनौ : आज यजमान भारतीय संघ गतविजेत्या इंग्लंडसोबत भिडत आहे. टीम इंडियाने सलग पाच विजय मिळवून आपला दबदबा निर्माण केला आहे. तर, इंग्लिश संघाला अद्याप चालू विश्वचषकात साजेशी कामगिरी करता आली नाही. लखनौच्या एकाना स्टेडियमवर हा बहुचर्चित सामना खेळवला जात असून विजयाचा षटकार मारण्याचे आव्हान रोहितसेनेसमोर असेल. आजच्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकून इंग्लिश संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यंदाच्या विश्वचषकात प्रथमच भारतीय संघ फलंदाजी करत आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
चालू विश्वचषकात गतविजेत्या इंग्लिश संघाच्या कामगिरीने चाहत्यांना निराश केले. कर्णधार जोस बटलरची देखील चांगली राहिली नाही. त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ४३ आहे, जी त्याने न्यूझीलंडविरुद्ध केली होती.