England Men announce new squad : कोरोनामुळे सर्व प्रमुख खेळाडू विलगिकरणात, तरीही इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उतरवला नवा तगडा संघ!

इंग्लंडनं उद्यापासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी नव्या दमाच्या खेळाडूंचा नवा संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 03:43 PM2021-07-06T15:43:25+5:302021-07-06T15:44:14+5:30

whatsapp join usJoin us
England include nine uncapped players in revised squad, to be led by Ben Stokes, to face Pakistan in ODI series | England Men announce new squad : कोरोनामुळे सर्व प्रमुख खेळाडू विलगिकरणात, तरीही इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उतरवला नवा तगडा संघ!

England Men announce new squad : कोरोनामुळे सर्व प्रमुख खेळाडू विलगिकरणात, तरीही इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उतरवला नवा तगडा संघ!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी निवडलेल्या संघातील ३ खेळाडू व व्यवस्थापकीय टीममधील ४ सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्कात आलेल्या सर्व खेळाडू व सदस्यांना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे इंग्लंडनं उद्यापासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी नव्या दमाच्या खेळाडूंचा नवा संघ जाहीर केला. बेन स्टोक्स याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात ९ अनकॅप खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. 

इंग्लंड क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक अॅश्ली जाईल्स यांनी सांगितले की,''मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी युवा खेळाडूंना मिळाली आहे. या खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे आणि त्यांना आता ही संधी मिळाली आहे.  ८ तारखेपासून वन डे मालिकेला सुरुवात होणार असून १० व १३ जुलैला दुसरा व तिसरा वन डे सामना होणार आहे. त्यानंतर १६, १८ व २० जुलैला ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील. या मालिकेसाठी इंग्लंडनं वन डे संघ जाहीर केला होता. पण, आता सर्व खेळाडूंना विलगिकरणात जावे लागल्यानं ECB पुन्हा नवी टीम जाहीर करावी लागली. 

इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स ( कर्णधार), जॅक बॉल, डॅनी ब्रिग्ग्स, ब्रायडन कार्स, झॅक क्रॅवली, बेन डंकेट, लेवीस ग्रेगोरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, साकिब महमूद, डेवीड मलान, क्रेग ओव्हर्टन, मॅट पार्किसन, डेव्हिड पायने, फिल सॉल्ट, जॉन सिम्सन, जेम्स व्हिंस ( England's revised squad for PAK ODIs - Ben Stokes (C), Jake Ball, Danny Briggs, Brydon Carse, Zak Crawley, Ben Duckett, Lewis Gregory, Tom Helm, Will Jacks, Dan Lawrence, Saqib Mahmood, Dawid Malan, Craig Overton, Matt Parkinson, David Payne, Phil Salt, John Simpson, James Vince) 

हर्षा भोगलेचं ट्विट व्हायरल
''हा व्हायरस कुठे जाईल असं वाटत नाही. या चायनीज व्हायरसनं आता इंग्लंडच्या क्रिकेट संघात घुसखोरी केली आहे. बायो बबल अजून सुरक्षित करायला हवं. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.  दक्षिण आफ्रिकन प्रकार, ब्राझिलीयन प्रकार आणि भारतीय प्रकार असे सर्रास बोलले जाते. मग, जिथे या व्हायरसचा जन्म झालाय, त्याच्याबाबतीतही हाच नियम लागू व्हायला हवा,''असे सडेतोड मत हर्षा भोगले यांनी व्यक्त केले. 
 

Web Title: England include nine uncapped players in revised squad, to be led by Ben Stokes, to face Pakistan in ODI series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.