ICC Rankings: ICC क्रमवारीत इंग्लंडचा बोलबाला! न्यूझीलंडची झाली घसरण; जाणून घ्या भारताचे स्थान

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडने पहिले स्थान पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:03 PM2022-09-08T17:03:19+5:302022-09-08T17:05:34+5:30

whatsapp join usJoin us
England is on the first position and New Zealand is on the second position in the ICC ODI rankings | ICC Rankings: ICC क्रमवारीत इंग्लंडचा बोलबाला! न्यूझीलंडची झाली घसरण; जाणून घ्या भारताचे स्थान

ICC Rankings: ICC क्रमवारीत इंग्लंडचा बोलबाला! न्यूझीलंडची झाली घसरण; जाणून घ्या भारताचे स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला असून भारतासह अनेक संघ टी-20 सामने खेळत आहेत. अशातच इंग्लंडच्या (England) संघाने एकदिवसीय आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेऊन पहिले स्थान गाठले आहे. तर न्यूझीलंडच्या संघाची पहिल्या स्थानी विराजमान होण्याची संधी हुकली आहे. सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये (AUS vs ENG) एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. आज मालिकेतील दुसरा सामना पार पडला ज्यामध्ये कांगारूच्या संघाने मोठा विजय मिळवून किवी संघाला धूळ चारली. याचाच फटका केन विलियमसनच्या संघाला आयसीसी क्रमवारीत बसला आहे.

दरम्यान, 119 रेटिंगसह इंग्लिश संघ एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर 117 रेटिंगसह न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर स्थित आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे 111, 107. 104 आणि 101 रेटिंगसह आहेत. मे 2021 मध्ये न्यूझीलंडच्या संघाने अव्वल स्थान गाठले होते. मात्र आता इंग्लंडने त्यांचे अव्वल स्थान पुन्हा मिळवले असून किवीच्या संघाला धक्का दिला आहे. लक्षणीय बाब म्हणजे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये केवळ 2 गुणांचे अंतर आहे. परंतु ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतून हे अंतर कापणे न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान असणार आहे.

 

ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी
एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने निसटता विजय मिळवला होता. तर आज झालेल्या सामन्यात कांगारूच्या संघाने न्यूझीलंडला अवघ्या 82 धावांवर सर्वबाद करून मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर 196 धावांचे आव्हान ठेवले होते. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली तर मिचेल स्टार्कने 38 धावांची नाबाद खेळी करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचे फलंदाज गारद झाले. एकट्या डम झाम्पाने 5 बळी पटकावले तर मिचेल स्टार्क (2) शॉन बॉट (2) आणि मार्कस स्टॉयनिसने 1 बळी घेऊन ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 


 

Web Title: England is on the first position and New Zealand is on the second position in the ICC ODI rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.