Join us  

Pak vs Eng: पाकिस्तानी गोलंदाजांना धु-धु धुतलं, England नं एका दिवसात ठोकल्या ५०६ धावा, ४ शतकंही

England breaks 112 years old record: कसोटी सामन्यांच्या इतिहासात पहिल्या दिवशी करण्यात आलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 7:26 PM

Open in App

England breaks 112 years old record: एका दिवसांपूर्वीच आजारी पडलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानी गोलंदांचा सुपडा साफ केला. खराब लाईटमुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा इंग्लंडच्या संघानं ७५ षटकांमध्ये ६.७५ च्या रेन रेटनं ४ विकेट गमावून ५०६ धावा ठोकल्या. कोणत्याही कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी करण्यात आलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. आजपर्यंत कोणत्याही संघाला ५०० धावांचा पल्ला गाठता आला नव्हता. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं ९ डिसेंबर १९१० रोजी सिडनीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ विकेट गमावून ४९४ धावा केल्या होत्या.

इंग्लंडच्या नावे वर्ल्ड रेकॉर्डसामन्यात जॅक क्राऊलीनं १११ चेंडूंमध्ये २१ चौकारांच्या मदतीनं १२२ धावा केल्या. याशिवाय त्यानं इंग्लंडकडून ओपनर म्हणून सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला. यानंतर डकेटनं ११० चेंडूंमध्ये १०७ धावा, तर ओली पोपनं १०४ चेंडूंमध्ये १०८ धावा आणि हॅरी ब्रुक्सनं ८१ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं नाबाद १०१ धावा केल्या. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्सनं १५ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ३४ नाबाद धावा केल्या.

ब्रुक्सनं एका ओव्हरमध्ये सहा चेंडूंमध्ये ६ चौकारही ठोकले. जर खराब लाईट्समुळे सामना थांबला नसता तर अजून १५ षटकांचा खेळ झाला असता. याच वेगानं इंग्लंडनं ६०० धावांचाही पल्ला गाठण्याची शक्यता होती.

पाकिस्तानी गोलंदाजांना धुतलंव्हायरल आजार झालेल्या खेळाडूंमध्ये क्राऊलीचा समावेश नव्हता. जेव्हा तो ९९ धावांवर होता तेव्हा अंपायरनं त्याला आऊट दिलं. परंतु रिव्ह्यूनंतर हा निर्णय बदलण्यात आला. त्यानं ११ चेंडूंमध्ये २१ चौकार ठोकत १२२ धावा केल्या. सहा वनंतरषांमध्ये ल्कसोटी संघात स्थान मिळालेल्या डकेट नं ११० चेंडूंचा सामना करत १०७ धावा ठोकल्या. हे त्याचं पहिलं शतक आहे.

पाकिस्ताननं दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात तीन विकेट्स घेऊन पुनरागमन केलं. परंतु क्राऊली आणि डकेटनं २३३ धावांची भागीदारी केली. जाहिद महमूदनं १६० धावांवर दोन गडी, तर हारिस रऊफनं ७८ धावा देत १ गडी बाद केला. तर मोहम्मद अलीनं १७ षटकांमध्ये ९६ धावा १ गडी बाद केला.

 

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तान
Open in App