England announced squad for T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. स्फोटक फलंदाज जेसन रॉय ( Jason Roy) याला संघाबाहेर करून इंग्लंड क्रिकेड बोर्डाने मोठा निर्णय घेतला. रॉयचा फॉर्म हा काही खास सुरू नव्हता. जोफ्रा आर्चर हा अजूनही तंदुरुस्त झाला नसल्याने त्याला आणखी एक वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागणार आहे. अॅलेक्स हेल्स हाही १५ सदस्यीय संघाचा भाग नाही.
ख्रिस वोक्स व मार्क वूड हे तंदुरुस्त झाले असून दोघांनाही वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या आणि पाकिस्तान दौऱ्यावरील संघात सहभागी केले आहे. मार्च महिन्यानंतर हे दोघेही पुनरागमन करणार आहेत. जॉनी बेअरस्टो व
जोस बटलर सलामीला खेळतील.
जोफ्रा आर्चर २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही खेळला नव्हता, आता तो २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.
जोस बटलर दुखापतग्रस्त असूनही पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे, परंतु तो तेथे सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही. त्याच्या जागी उप कर्णधार मोईन अली पाकिस्तान दौऱ्यावर कर्णधारपद भूषवेल.
ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप संघ जाहीर; IPLमध्ये सारा ज्याची बॅटींग पाहून झालेली क्रेझी त्याला संधी
इंग्लंडचा वर्ल्ड कप साठीचा संघ ( England squad for T20 WC) - जोस बटलर ( कर्णधार). मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, हॅरी ब्रुक, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, आदील राशिद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड ( Jos Buttler (c), Moeen Ali, Jonny Bairstow, Harry Brook, Sam Curran, Chris Jordan, Liam Livingstone, Dawid Malan, Adil Rashid, Phil Salt, Ben Stokes, Reece Topley, David Willey, Chris Woakes, Mark Wood), राखीव खेळाडू - लिएम डॉसन, रिचर्ड ग्लिसन, टायमल मिल्स ( Reserves: Liam Dawson, Richard Gleeson, Tymal Mills)
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका
९ ऑक्टोबर - पहिली ट्वेंटी-२०, पर्थ
१२ ऑक्टोबर - दुसरी ट्वेंटी-२०, कॅनबेरा
१४ ऑक्टोबर - तिसरी ट्वेंटी-२०, कॅनबेरा
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडचे वेळापत्रक
२२ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्ता, पर्थ
२६ ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध B2 ( पात्रता फेरीतील संघ), मेलबर्न
२८ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न
१ नोव्हेंबर - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, ब्रिस्बन
५ नोव्हेंबर - इंग्लंड विरुद्ध A1 ( पात्रता फेरीतील संघ), सिडनी
Web Title: England Men name squad for ICC Men's T20 World Cup : Jason Roy dropped from the T20 World Cup squad. Jofra Archer hasn't recovered yet so he misses out too, no Alex Hales either.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.