Join us  

IND vs ENG, T20I & ODI Squads : इंग्लंड नव्या कर्णधारासह ट्वेंटी-२० व वन डे मालिकेत भारताला टफ फाईट देणार; यजमानांच्या संघांची घोषणा

England Men name squads : टीम इंडियापाठोपाठ यजमान इंग्लंडनेही ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 5:18 PM

Open in App

England Men name squads : टीम इंडियापाठोपाठ यजमान इंग्लंडनेही ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन याने मालिकेला सुरूवात होण्याआधीच निवृत्ती जाहीर केल्यामुळे इंग्लंडचा नवा कर्णधार कोण, याची चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्फोटक फलंदाज जोस बटलर याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. इंग्लंडने ट्वेंटी-२० मालिकेसाठी १४, तर वन डे मालिकेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.  फिरकीपटू आदील रशीद हा हज यात्रेला गेल्याने तो दोन्ही मालिकेसाठी उपलब्ध नाही. 

इंग्लंडचा ट्वेंटी-२० संघ - जोस बटलर ( कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, रिचर्ड ग्लीसन, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, टायमल मिल्स, मॅथ्यू पर्किसन, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रिस टॉप्ली, डेव्हिड विली. ( England Men's Vitality IT20 squad v India: Jos Buttler (Lancashire) (captain), Moeen Ali (Worcestershire), Harry Brook (Yorkshire), Sam Curran (Surrey), Richard Gleeson (Lancashire), Chris Jordan (Surrey), Liam Livingstone (Lancashire), Dawid Malan (Yorkshire), Tymal Mills (Sussex), Matthew Parkinson (Lancashire), Jason Roy (Surrey), Phil Salt (Lancashire), Reece Topley (Surrey), David Willey (Yorkshire) ) 

इंग्लंडचा वन डे संघ - जोस बटलर ( कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, ब्रेडन कार्से, सॅम कुरन, लिएम लिव्हिंगस्टोन, क्रेग ओव्हर्टन, मॅथ्यू पर्किसन, जो रूट, जेसन रॉय, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, डेव्हिड विली. ( England Men’s Royal London ODI squad v India: Jos Buttler (Lancashire) (captain). Moeen Ali (Worcestershire), Jonathan Bairstow (Yorkshire), Harry Brook (Yorkshire), Brydon Carse (Durham), Sam Curran (Surrey), Liam Livingstone (Lancashire), Craig Overton (Somerset), Matthew Parkinson (Lancashire), Joe Root (Yorkshire), Jason Roy (Surrey), Phil Salt (Lancashire), Ben Stokes (Durham), Reece Topley (Surrey), David Willey (Yorkshire) ) 

पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारताचा संघ-  रोहित शर्मा ( कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दीनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक 

दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेंटी-20 साठी भारताचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उम्रान मलिका  

वन डे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा. शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, अर्षदी सिंग 

ट्वेंटी-२० मालिका 

पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉलदुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टनतिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज वन डे मालिका 

पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हलदुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्सतिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माजोस बटलर
Open in App