इंग्लंडकडून 'फिरकी'चं जाळं; पहिल्या कसोटीसाठी Playing XI मध्ये ४ स्पिनर्स; जेम्स अँडरसनला विश्रांती

England's Playing XI for 1st Test vs India : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने आज त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:40 PM2024-01-24T13:40:36+5:302024-01-24T13:41:26+5:30

whatsapp join usJoin us
England named their playing XI for 1st test against India at Hyderabad starting on Thursday, they have named four spinners in their side and one seamer  | इंग्लंडकडून 'फिरकी'चं जाळं; पहिल्या कसोटीसाठी Playing XI मध्ये ४ स्पिनर्स; जेम्स अँडरसनला विश्रांती

इंग्लंडकडून 'फिरकी'चं जाळं; पहिल्या कसोटीसाठी Playing XI मध्ये ४ स्पिनर्स; जेम्स अँडरसनला विश्रांती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England's Playing XI for 1st Test vs India  ( Marathi News ) :  भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने आज त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. इंग्लंडचा संघ मागील १२ वर्षांत भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही, तेच दुसरीकडे भारताने २०१३ पासून घरच्या मैदानावर ४६ पैकी ३६ कसोटी सामने जिंकले आहेत, तेच फक्त ३ सामने गमावले आहेत. पण, २०२४ ची ही मालिका खास असणार आहे, कारण दोन्ही संघांमध्ये बऱ्याच वर्षांची ५ सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. विराट कोहलीच्या माघारीमुळे भारतीय संघावर दडपण नक्की वाढले असेल आणि तेच हेरून इंग्लंडनं फिरकीचं जाळं विणलं आहे.

विराटच्या जागी अजिंक्य किंवा पुजाराची निवड का नाही? रोहित शर्माचं मोठं विधान  

इंग्लंड संघाला २०१२ पासून भारतीय भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १३१ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने ३१ सामने, इंग्लंडने ५० सामने जिंकले आहेत. ५० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय खेळपट्टींमधील हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताने ६४ पैकी २२ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला १४ कसोटी जिंकल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली गेली आहे. 


इंग्लंडने जाहीर केलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार फिरकीपटू व एका जलदगती गोलंदाजाचा समावेश केला आहे. लँकशायर क्लबचा टॉम हार्टली उद्या कसोटी पदार्पण करणार आहे. ऑली पोप, बेन फोक्स, रेहान अहमद व जॅक लीच हे चार खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील कसोटीत संघात नव्हते. पण, भारताविरुद्ध त्यांचे पुनरागमन झाले आहे. फिरकी गोलंदाज शोएब बशीरला ( Shoaib Bashir ) इंग्लंडमध्ये परतावे लागले. व्हिसाच्या समस्येमुळे तो भारतात येऊ शकला नाही.  
 
इंग्लंडचा संघ ( England Men's XI ) - झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स ( कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच ( Zak Crawley, Ben Duckett, Ollie Pope, Joe Root, Jonny Bairstow, Ben Stokes (C), Ben Foakes, Rehan Ahmed, Tom Hartley, Mark Wood, Jack Leach ) 

Web Title: England named their playing XI for 1st test against India at Hyderabad starting on Thursday, they have named four spinners in their side and one seamer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.