England's Playing XI for 1st Test vs India ( Marathi News ) : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने आज त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. इंग्लंडचा संघ मागील १२ वर्षांत भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही, तेच दुसरीकडे भारताने २०१३ पासून घरच्या मैदानावर ४६ पैकी ३६ कसोटी सामने जिंकले आहेत, तेच फक्त ३ सामने गमावले आहेत. पण, २०२४ ची ही मालिका खास असणार आहे, कारण दोन्ही संघांमध्ये बऱ्याच वर्षांची ५ सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. विराट कोहलीच्या माघारीमुळे भारतीय संघावर दडपण नक्की वाढले असेल आणि तेच हेरून इंग्लंडनं फिरकीचं जाळं विणलं आहे.
विराटच्या जागी अजिंक्य किंवा पुजाराची निवड का नाही? रोहित शर्माचं मोठं विधान
इंग्लंड संघाला २०१२ पासून भारतीय भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १३१ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने ३१ सामने, इंग्लंडने ५० सामने जिंकले आहेत. ५० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय खेळपट्टींमधील हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताने ६४ पैकी २२ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला १४ कसोटी जिंकल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली गेली आहे.