विश्वचषकात सर्वोत्कृष्ट ठरेल इंग्लंड-न्यूझीलंड उपांत्य लढत- सुनील गावसकर

२०१५ च्या ऑस्ट्रेलियातील विश्वचषकात पहिल्या फेरीत बाहेर पडल्याची नामुष्की झेलल्यापासून इंग्लंडने या प्रकारात बरेच बदल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:27 PM2021-11-10T12:27:45+5:302021-11-10T12:30:02+5:30

whatsapp join usJoin us
England-New Zealand semi-final match will be the best in the World Cup - Sunil Gavaskar | विश्वचषकात सर्वोत्कृष्ट ठरेल इंग्लंड-न्यूझीलंड उपांत्य लढत- सुनील गावसकर

विश्वचषकात सर्वोत्कृष्ट ठरेल इंग्लंड-न्यूझीलंड उपांत्य लढत- सुनील गावसकर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सुनील गावसकर

आयीसीसी टी-२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना बुधवारी इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. हे दोन संघ  २०१९ च्या वन डे विश्वचषक अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळले. न्यूझीलंड त्या सामन्यात पराभूत झाला तरी जगातील चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळविले होते. त्यानंतर न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी चॅम्पियनशिप जिंकून अपयश पुसून काढले. आता टी-२० विश्वचषकावर नाव कोरण्याइतपत मजल गाठली आहे. तथापि, हे सोपे नाही. इंग्लंडसारखा बलाढ्य संघ मर्यादित षटकात अनेक वर्षांपासून वर्चस्व गाजवीत आहे.

२०१५ च्या ऑस्ट्रेलियातील विश्वचषकात पहिल्या फेरीत बाहेर पडल्याची नामुष्की झेलल्यापासून इंग्लंडने या प्रकारात बरेच बदल केले. त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या खेळात झळकतो. विश्वचषकानंतर ब्रेंडन मॅक्यूलमच्या नेतृत्वात न्यूझीलंडने इंग्लंडचा दौरा केला. मॅक्यूलमने आयपीएल इतिहासात पहिल्याच सामन्यात १५८ धावा ठोकल्या होत्या. तेव्हापासून ही लीग सतत लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्या मालिकेत न्यूझीलंडने केलेल्या कामगिरीच्या एक पाऊल पुढे जात इंग्लंडने कामगिरी केली. प्रत्येक चेंडूवर न्यूझीलंडच्या तुलनेत वरचढ कामगिरी करीत पुढच्या विश्वचषकात चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. 

इंग्लंडने २०१० ला वेस्ट इंडिजमध्ये झालेला टी-२० विश्वचषक जिंकला होता. कॉलिंगवूड त्यावेळी कर्णधार तर पीटरसन हा फलंदाजीचा कणा होता. आता इंग्लंडकडे पीटरसनसारखे अनेक फलंदाज आहेत. जोस बटलर, जॉनी बेयरेस्टो, लियॉम लिव्हिंगस्टोन, कर्णधार इयोन मोर्गन हे मोठे फटके मारण्यात पटाईत आहेत. इंग्लंडला आतापर्यंत मोर्गनची फलंदाज म्हणून गरज भासली नाही. पण तो चाणाक्ष कर्णधार आहे, हे त्याने सिद्ध केले. गोलंदाज बदलणे, क्षेत्ररक्षणातील बदल हे प्रतिस्पर्धी फलंदाजाला खेळण्याची मोकळीक देत नाही. केन विलियम्सन हा देखील असाच कर्णधार आहे. शांत, संयमी आणि संघ सहकाऱ्यांचा आदर बाळगणारा. न्यूझीलंड संघ चर्चेत राहत नाही, ही त्यांच्या जमेची बाजू आहे. यामुळे अपेक्षांचे ओझे नसल्याने मैदानावर धोकादायक बनतो. मिळालेल्या संधीचा लाभ घेतो. या संघात फलंदाज आणि गोलंदाजांचे उत्तम संयोजन आहे. क्षेत्ररक्षण तर फारच उच्च दर्जाचे ठरले. स्पर्धेत हा सामना सर्वाेत्कृष्ट ठरावा. (टीसीएम)

Web Title: England-New Zealand semi-final match will be the best in the World Cup - Sunil Gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.