PAK vs ENG: पाकिस्तानात टॉयलेटला जायला पण भीती वाटते, इंग्लंडच्या खेळाडूचा मोठा खुलासा

इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे, तिथे 7 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:35 PM2022-09-21T14:35:13+5:302022-09-21T14:36:28+5:30

whatsapp join usJoin us
England player harry book said that he is afraid to go to the toilet in Pakistan | PAK vs ENG: पाकिस्तानात टॉयलेटला जायला पण भीती वाटते, इंग्लंडच्या खेळाडूचा मोठा खुलासा

PAK vs ENG: पाकिस्तानात टॉयलेटला जायला पण भीती वाटते, इंग्लंडच्या खेळाडूचा मोठा खुलासा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे, तिथे 7 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लिश संघाने यजमान संघाला पराभवाची धूळ चारली. मात्र सामन्यात निर्णायक भूमिका पार पाडणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूने एक विधान करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना पाकिस्तानात वावरताना भीती वाटत असल्याचे त्याने म्हटले.  इंग्लंडच्या मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज हॅरी ब्रुकने म्हटले आहे की, पाकिस्तानात टॉयलेटला जातानाही असे वाटते की ज्याचा प्रत्यय यापूर्वी कधीच आला नाही.

हॅरी ब्रुकने मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. कराचीच्या मैदानावर त्याने 25 चेंडूत 42 करून पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडला. 168 च्या सरासरीने धावा करून ब्रुकने इंग्लिश संघाला विजय मिळवून दिला. त्याने केलेल्या निर्णायक खेळीमुळे इंग्लंडला 159 धावांचे आव्हान सहज गाठता आले.

टॉयलेटमध्ये जातो तेव्हा असे वाटते की कोणीतरी मागे उभे आहे - हॅरी ब्रूक
 मॅच-विनिंग खेळीनंतर हॅरी ब्रुकने पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत धक्कादायक खुलासा केला. "जेव्हा मी टॉयलेटला जातो तेव्हा असे वाटते की कोणीतरी माझ्या मागे येत आहे किंवा माझ्या मागे उभे आहे, असा मला भास होत राहतो. मला याआधी असा अनुभव कधीच आला नव्हता." ब्रुकने केलेल्या विधानावरून पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. कारण तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानात मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे.

हे लज्जास्पद आहे - नासिर हुसैन
ब्रुकच्या या विधानानंतर इंग्लंडच्या संघाचा माजी कर्णधार नासिर हुसैनने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. त्याने म्हटले, "फिरण्यासाठी अर्थात पर्यटनासाठी पाकिस्तान हे उत्तम ठिकाण आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना फिरू दिले जात नाही आणि त्यांना फक्त सुरक्षा वर्तुळातच ठेवले जात आहे, हे लज्जास्पद आहे." अशा शब्दांत नासिर हुसैनने प्रश्न उपस्थित केले आहेत. खरं तर पाकिस्तानच्या धरतीवर इंग्लंडचा संघ मोठ्या कालावधीनंतर आल्यामुळे खास काळजी घेतली जात आहे. इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला काही होऊ नये म्हणून पाकिस्तानने त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. 


 

Web Title: England player harry book said that he is afraid to go to the toilet in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.