Join us  

KKRच्या फलंदाजाचा इंग्लंडकडून खेळण्यास नकार? फ्रँचायझी बक्कळ पैसा मोजायला तयार  

इंग्लंडचा स्टार फलंदाज जेसन रॉय ( Jason Roy) याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा वार्षिक करार न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 3:44 PM

Open in App

इंग्लंडचा स्टार फलंदाज जेसन रॉय ( Jason Roy) याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा वार्षिक करार न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतून इंग्लंडला स्थायिक झालेल्या जेसन रॉयची तुलना सुरुवातीपासून केव्हिन पीटरसनशी झाली. रॉयने या वर्षी जुलै महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटसाठी  कोलकाता नाइट रायडर्सचा करार स्वीकारला आहे, ज्यामुळे रॉयला आता सुमारे ३ लाख पौंड म्हणजेच दोन वर्षांसाठी तीन कोटींहून अधिक पैसे मिळणार आहेत यासाठी रॉयने ECBचा करार स्वीकारला नाही. ECBचा सध्याचा करार ६० लाख रुपयांचा होता.

गेल्या काही महिन्यांपासून, काही इंग्लिश खेळाडूंना अशा ऑफर आल्याची चर्चा होती, त्यामुळे त्यांना संभ्रमावस्थेतून जावे लागत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले होते की जर रॉय किंवा इतर खेळाडूने अमेरिकन लीग करारावर स्वाक्षरी केली, त्याचा इंग्लंड करार संपुष्टात येईल. रॉयसाठी हा खूप मोठा निर्णय होता, कारण त्याने २०१९मध्ये इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकण्यात मदत केली होती. जगातील अनेक क्रिकेट बोर्ड विशेषतः वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यांसारख्या देशांच्या खेळाडूंना देशाऐवजी ट्वेंटी-२० लीगला महत्त्व देण्याच्या निर्णयापूर्वी इंग्लंडने आश्चर्य व्यक्त केले होते, परंतु आता या लीगमध्ये खेळाडूंना कोणत्या प्रकारची मोठी डील मिळते, हे त्यांच्या लक्षात आले आहे. 

जेसन रॉयने यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. जॉस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांनाही अनुक्रमे राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्सकूडन अशी ऑफर आहे. पण, जेसन रॉयने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. इंग्लंडकडून खेळणे हेच प्राधान्य असल्याचे त्याने ट्विट केले आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२३इंग्लंड
Open in App