Join us  

ENG vs SL : पहिल्याच सामन्यात इंग्लंडचे खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात; जाणून घ्या कारण 

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 6:04 PM

Open in App

ENG vs SL, 1st Test : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला जात आहे. पाहुण्या श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत इंग्लंडचा संघ कर्णधार बेन स्टोक्सशिवाय मैदानात आहे. काही दिवसांपूर्वी द हंड्रेड स्पर्धेत खेळताना दुखापत झाल्याने स्टोक्स संघाबाहेर झाला. अशा परिस्थितीत ऑली पोप इंग्लिश संघाचे नेतृत्व करत आहे. जॅक क्रॉलीच्या जागी डॅन लॉरेन्सला सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत क्रॉलीच्या बोटाला दुखापत झाली होती. 

वेगवान गोलंदाज मिलन रत्नायके श्रीलंकेसाठी पदार्पण करत आहे. कुमार संगकाराने त्याला पदार्पणाची कॅप सोपवली. संगकाराने पदार्पणाची कॅप मिलन रत्नायकेकडे सोपवतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यासह श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेट खेळणारा मिलन हा १६६ वा खेळाडू ठरला. 

पहिल्या सामन्यात इंग्लंडचे खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरले. इंग्लंडचा माजी खेळाडू ग्राहम थोर्पला श्रद्धांजली वाहण्यासाठी इंग्लिश खेळाडूंनी काळ्या फिती बांधल्या. अलीकडेच थोर्पचे निधन झाले मग त्याच्या पत्नीने आत्महत्या असल्याचे सांगितले. त्याच्या पत्नीने सांगितले होते की, थॉर्प हा अनेक दिवसांपासून नैराश्याने त्रस्त होता. थॉर्पच्या नावावर १०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आहे. निवृत्ती घेतल्यानंतर त्याने प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडचा कर्णधार ओली पोप म्हणाला की, इंग्लंडचा संघ संपूर्ण सामन्यादरम्यान हातावर काळ्या फिती बांधून खेळेल. 

इंग्लंडचा संघ - ओली पोप (कर्णधार), बेन डकेट, डॅन लॉरेंस, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड, शोएब बशीर. 

श्रीलंकेचा संघ - धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करूणारत्ने, निशान मदुश्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंदीमल, कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, मिलन रत्नायके. 

टॅग्स :इंग्लंडश्रीलंका