इंग्लंडच्या संघावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणून खेळाडूंनी घेतला 'हा' निर्णय!

ind vs eng 3rd test live updates cricket match score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाआधी यजमानांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 04:05 PM2021-08-26T16:05:00+5:302021-08-26T16:05:25+5:30

whatsapp join usJoin us
England players are wearing black armbands today to honour the passing of our former captain Ted Dexter | इंग्लंडच्या संघावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणून खेळाडूंनी घेतला 'हा' निर्णय!

इंग्लंडच्या संघावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणून खेळाडूंनी घेतला 'हा' निर्णय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ind vs eng 3rd test live updates cricket match score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाआधी यजमानांवर दुःखाचा डोंगर कोसळला. इंग्लंड व ससेक्स क्लबचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. ( Ted Dexter: Former England and Sussex captain dies aged 86). लॉर्ड टेड या टोपण नावानं ते ओळखले जायचे. त्यांनी ६२ कसोटी सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आणि १९६१ ते ६४ या कालावधीत त्यांनी संघाच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली ससेक्स क्लबनं १९६८मध्ये Gillette Cup या मर्यादित षटकांच्या स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वाचे जेतेपद पटकावले होते आणि त्या जोरावर त्यांनी पुन्हा इंग्लंड संघात पुनरागमन केलं होतं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू आज मैदानावर दंडावर काळी फित बांधून मैदानावर उतरले. 


 
मेरिलेबोन क्रिकेट क्लबनं जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक... त्यांनी ६२ कसोटी सामन्यांपैकी ३० सामन्यांत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. आक्रमक फलंदाज अन् तितकाच आक्रमक कर्णधार.'' डेक्स्टर यांच्या नावावर ४५०२ धावा आणि ६६ विकेट्स आहेत. त्यांनी कसोटीत ९ शतकं झळकावली आणि त्यापैकी ६ वेळा त्यांनी १४०+ धावा केल्या आहेत.    

Web Title: England players are wearing black armbands today to honour the passing of our former captain Ted Dexter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.