Join us  

इंग्लंडकडून द. आफ्रिकेचा धुव्वा

ओव्हल मैदानावर झालेल्या १00 व्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला २३९ धावांनी धुव्वा उडवला. या ऐतिहासिक सामन्यात इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अली याने हॅटट्रीकसह चार बळी घेतले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:03 AM

Open in App

लंडन : ओव्हल मैदानावर झालेल्या १00 व्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला २३९ धावांनी धुव्वा उडवला. या ऐतिहासिक सामन्यात इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अली याने हॅटट्रीकसह चार बळी घेतले. अली हा ओव्हलवर हॅटट्रीक करणारा पहिला गोलंदाज ठरला. या विजयाने यजमान इंग्लंड संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. लॉडर्सवर झालेला मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने २११ धावांनी जिंकला होता, तर ट्रेंटब्रिज येथे झालेल्या दुसºया सामना दक्षिण आफ्रिकेने ३४0 धावांनी विजय मिळवला होता. आता चौथा सामना ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये शुक्रवारपासून खेळवण्यात येणार आहे.सामन्याच्या पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ४२९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु उपहारानंतर त्यांचा डाव २५२ धावांवर गुंडाळला गेला. अष्टपैलू मोईन अलीने ४५ धावांत ४ बळी घेत पाहुण्या संघाच्या डावाला खिंडार पाडले. सकाळी दक्षिण आफ्रिकेने ४ बाद ११७ धावांवरुन पुढे डाव सुरु केला. काल ७२ धावांवर नाबाद असलेल्या डिन एल्गरने आपले शतक पूर्ण केले, परंतु दुसºया बाजूने फलंदाज बाद होत राहिले. आफ्रिकेला हा विजय दुरापास्तच होता. कारण २00३ सालानंतर कोणताच संघ चौथ्या डावात इतकया मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करु शकलेला नाही, कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात वेस्ट इंडिजने आॅस्ट्रेलियाविरुध्द ७ बाद ४१८ धावा करुन विजय मिळवला होता. कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात त्यांना यश मिळते का इतकीच उत्सुकता होती. त्यासाठी त्यांना ९८ षटके खेळून काढावी लागणार होती. परंतु द. आफ्रिकेचे फलंदाज या कसोटीवर कूचकामी ठरले.मोईनची कमाल : मोईन अलीने आज ऐतिहासिक सामन्यात हॅटट्रीक मिळवून या मैदानावर अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या चौथ्या डावात गोलंदाजी करताना त्याने आपल्या १६ व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर डिन एल्गर (१३६) आणि कॅसिगो रबाडा याला बाद केले. अलीने पुढच्या षटकांत पहिल्याच चेंडूवर मोर्ने मोर्कलला पायचित करुन हॅटट्रीक साधली. पण हा बळी त्याला रिव्ह्यूवर मिळाला. पंच ज्योएल विल्सन यांनी मोर्कलला नाबाद ठरविले होते, परंतु अलीला खात्री असल्याने इंग्लंडने रिव्ह्यू घेतला. यात तो बाद असल्याचा निर्णय थर्ड अंपायर कुमार धर्मसेना यांनी दिला, आणि मोईन एका ऐतिहासिक कामगिरीचा मानकरी ठरला.