इंग्लंडची सर्वात यशस्वी फिरकीपटून लॉरा मार्शनं सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 33 वर्षीय मार्शनं 2006मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 13 वर्षांच्या कारकिर्दीत तिनं 217 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेत इंग्लंड महिला क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी फिरकीपटूचा मान मिळवला. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या इंग्लंडच्या गोलंदाजांत ती तिसऱ्या स्थानावर आहे.
2009च्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत तिनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. तिच्या नावावर तीन वर्ल्ड कप आहेत. इंग्लंडच्या महिला संघाचे व्यवस्थापकीय संचालक क्लॅर कोनोर यांनी सांगितले की,''लॉरानं 13 वर्ष इंग्लंड क्रिकेटसाठी अमुल्य योगदान दिलं. इंग्लंड महिला क्रिकेट इतिहासात ती सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.''
मार्शनं 9 कसोटी, 103 वन डे आणि 67 ट्वेंटी-20 सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. तिनं कसोटीत 24, वन डेत 129 आणि ट्वेंटी-20त 64 विकेट्स घेतल्या आहेत.
Web Title: England off-spinner Laura Marsh has announced her international retirement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.