England announced squad for T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. स्फोटक फलंदाज जेसन रॉय ( Jason Roy) याला संघाबाहेर करून इंग्लंड क्रिकेड बोर्डाने मोठा निर्णय घेतला. रॉयचा फॉर्म हा काही खास सुरू नव्हता. जोफ्रा आर्चर हा अजूनही तंदुरुस्त झाला नसल्याने त्याला आणखी एक वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागणार आहे. अॅलेक्स हेल्स हाही १५ सदस्यीय संघाचा भाग नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दुपारी ३ वाजता संघ जाहीर केला अन् रात्री साडेआठ वाजता दुखापतीमुळे स्फोटक फलंदाजाच्या माघारीचं ट्विट त्यांना करावे लागले.
ख्रिस वोक्स व मार्क वूड हे तंदुरुस्त झाले असून दोघांनाही वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या आणि पाकिस्तान दौऱ्यावरील संघात सहभागी केले आहे. मार्च महिन्यानंतर हे दोघेही पुनरागमन करणार आहेत. जोफ्रा आर्चर २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही खेळला नव्हता, आता तो २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. जोस बटलर दुखापतग्रस्त असूनही पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे, परंतु तो तेथे सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही. त्याच्या जागी उप कर्णधार मोईन अली पाकिस्तान दौऱ्यावर कर्णधारपद भूषवेल.
गोल्फ खेळताना झाली दुखापत अन्...इंग्लंडला मोठा धक्का बसला... फॉर्मात असलेला फलंदाज जॉनी बेअरस्टो याला दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. लिड्सवर शुक्रवारी गोल्फ खेळताना अपघाताने त्याला दुखापत ( lower limb injury ) झाली आणि अता तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याची रिप्लेसमेंट अद्याप जाहीर केली गेलेली नाही.
इंग्लंडचा वर्ल्ड कप साठीचा संघ ( England squad for T20 WC) - जोस बटलर ( कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, आदील राशिद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका९ ऑक्टोबर - पहिली ट्वेंटी-२०, पर्थ१२ ऑक्टोबर - दुसरी ट्वेंटी-२०, कॅनबेरा१४ ऑक्टोबर - तिसरी ट्वेंटी-२०, कॅनबेरा
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडचे वेळापत्रक २२ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्ता, पर्थ२६ ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध B2 ( पात्रता फेरीतील संघ), मेलबर्न२८ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न१ नोव्हेंबर - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, ब्रिस्बन५ नोव्हेंबर - इंग्लंड विरुद्ध A1 ( पात्रता फेरीतील संघ), सिडनी