लंडन : इंग्लंडने व्यस्त कार्यक्रमाचा भार कमी करण्यासाठी कसोटी क्रिकेट पाच ऐवजी चार दिवसाचे करण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) योजनेचे समर्थन केले. आयसीसी २०२३ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये समावेश असलेल्या लढती अनिवार्यपणे चार दिवसीय करण्याचा विचार करत आहे.
ईसीबीचा प्रवक्ता म्हणाला, ‘यामुळे खेळाचा व्यस्त कार्यक्रम व खेळाडूंच्या कार्यभाराची गरज यावर स्थायी तोडगा निघू शकतो.’ कसोटी क्रिकेटचा इतिहास सुमारे १४० वर्षे जुना असून कसोटी क्रिकेट पाच दिवसांमध्ये खेळले जाते. जर २०१५-२०२३ या कालावधीत चारदिवसीय कसोटी सामने झाले असते, तर ३३५ दिवसांचा कालावधी वाचला असता.
चारदिवसीय कसोटी नवा प्रकार नाही. यंदा सुरुवातीला इंग्लंड व आयर्लंड यांच्यादरम्यान चारदिवसीय कसोटी सामने खेळले गेले होते. त्यापूर्वी २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे यांच्यादरम्यानही अशी लढत झाली होती. प्रवक्ता म्हणाला, ‘आमचे निश्चितच या योजनेला समर्थन आहे. पण हे खेळाडू, प्रशंसक आणि हितचिंतकांसाठी कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला आव्हान देण्यासारखे आहे, असे आम्हाला वाटते.’ (वृत्तसंस्था)
‘गांभीर्याने विचार व्हावा’
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी २०२३ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपदमधील सामने चार दिवसीय कसोटीच्या रूपाने करण्याच्या योजनेबाबत बोलताना म्हटले की, ‘आताच यावर वक्तव्य करणे घाईचे ठरेल.’ तसेच, क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी केव्हिन रॉबर्टस् यांनी, ‘चार दिवसीय कसोटीवर गांभीर्याने विचार करायला हवा,’ असे सांगितले होते.
Web Title: England support England in four-day match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.