दुबई : ‘आयसीसी’ने जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत भारताची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांतील मालिका विजयाच्या कामगिरीवर ’आयसीसी’ने ही नवी क्रमवारी जाहीर केली. इंग्लंडला तब्बल पाच वर्षांनंतर क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले. इंग्लंडने २०१४-१५ या वर्षात २५ पैकी केवळ ७ सामने जिंकून अतिशय खराब कामगिरी केली. मात्र, २०१५-१६ आणि २०१६-१७ या सत्रात कामगिरीचा दर्जा उंचावल्याने ८ गुणांची कमाई करत इंग्लंडने १२५ गुणांसह अव्वल स्थान पटकविले.
ताज्या क्रमवारीत एक गुण गमविणाºया भारताला १२२ गुणांसह दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुसºया क्रमांकावर असलेल्या द. आफ्रिकेला ४ गुणांचा फटका बसल्याने आफ्रिकेचा संघ ११७ वरून ११३ गुणांसह तिसºया स्थानावर फेकला गेला. चौथ्या क्रमांकापासून पुढील क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. २०१९च्या वन डे विश्वचषकात आज जाहीर झालेल्या क्रमवारीतील पहिले १० संघ सहभागी होणार आहेत.
जुलै महिन्यात भारताचा संघ ३ टी २०, ३ एकदिवसीय आणि ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौºयावर जाणार आहे. त्यावेळी वन डे मालिका जिंकून
पुन्हा अव्वल स्थानावर झेप
घेण्याची भारताला संधी असेल. (वृत्तसंस्था)'
एकदिवसीय क्रमवारी :
इंग्लंड १२५ गुण, भारत १२२ गुण, द.आफ्रिका ११३ गुण, न्यूझीलंड ११२ गुण, आॅस्ट्रेलिया १०४ गुण, पाकिस्तान १०२ गुण, बांगलादेश ९३ गुण, श्रीलंका ७७ गुण, वेस्ट इंडिज ६९ गुण, अफगणिस्तान
६३ गुण.
Web Title: England top position, India slumped to second place
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.