Join us  

स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)

स्मिथनं परफेक्ट शॉट सिलेक्शनसह क्षेत्ररक्षक नसलेल्या जागेत हा अप्रतिम फटका खेळला होता. पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:13 AM

Open in App

England vs Australia, 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅटर स्टीव्हन स्मिथ (Steven Smith) याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संयमी अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडमधील ड्युरॅम काउंटी येथील चेस्टर-ल-स्ट्रीटच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथनं ५ चौकाराच्या मदतीने ८२ चेंडूचा सामना करताना संघाच्या खात्यात ६० धावांची भर घातली. 

बाउंड्री लाईनवर चपळाईनं अन् रंगात आलेल्या स्मिथचा झाला बेरंग 

संयमी खेळीनंतर गियर बदलताना जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने परफेक्ट शॉट सिलेक्शनसह क्षेत्ररक्षक नसलेल्या जागेत हा अप्रतिम फटका खेळला होता. पण  इंग्लंडच्या ताफ्यातील  ब्रायडन कार्स (Brydon Carse) याने चपळाईचा नजराणा पेश करत त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यामुळे स्मिथच्या खेळीला ब्रेक लागला. सीमारेषवर इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकाने दाखवलेल्या चपळाईमुळे रंगात आलेल्या स्मिथचा बेरंग झाला अन् त्याचा चेहरा पडला. तो अगदी निराश होऊन तंबूत परतताना दिसून आले. 

जोफ्रा आर्चरचा आखूड टप्प्यावर अप्रतिम फटका मारूनही स्मिथवर आली विकेट गमावण्याची वेळ

ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३५ व्या षटकात स्मिथ आणि विकेट किपर बॅटर ॲलेक्स कॅरी ही जोडी अगदी सेट झाली होती. ही जोडी फोडण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकनं (Harry Brook) चेंडू जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) हाती सोपवला. इंग्लंडच्या कॅप्टनची रणनिती यशश्वी ठरवण्यासाठी जोफ्रानं आखूड टप्प्याचा चेंडू (Short Delivery) टाकत स्मिथला पूल शॉट (Pull Shot) खेळायला भाग पाडलं. स्मिथनं आखूड टप्प्याच्या चेंडूला सीमारेषेपलिकडे पाठवण्यासाठी एकदम परफेक्ट फटकाही मारला. पण सीमारेषेवर ब्रायडन कार्सच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे इंग्लंडच्या संघानं ही जोडी फोडण्याचा डाव यशस्वी ठरवला.

अप्रितम झेल पाहून स्मिथचा चेहराच पडला

स्मिथने मारलेल्या जबरदस्त फटका सहज सीमारेषा ओलांडेल असं वाटत होते. पण मिशेल मार्शला बाद करणाऱ्या ब्रायडन कार्सने वेगाने धावत येऊन अशक्यप्राय वाटणारा झेल टिपला. त्याचा सीमारेषेवरील हा अफलातून झेल पाहून स्मिथही स्तब्ध झाला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या चेहऱ्यावरील भाव सर्वकाही सांगून गेले.  

 

 

टॅग्स :स्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियाइंग्लंड