चेन्नई : जसप्रीत बुमरा दुखापतग्रस्त झाल्यावर भारतीय संघापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. बुमराऐवजी एकदिवसीय संघात शार्दुल ठाकूरचा समावेश करण्यात आला, पण कसोटी सामन्यात बुमराची जागा कोण घेणार, याचे भारतीय संघावर दडपण होते. पण भारतीय संघासाठी एक खूषखबर आहे. आता वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी इंग्लंडमध्ये खेळू शकणार आहे.
शामी कसा इंग्लंडमध्ये खेळू शकतोसध्याच्या घडीला भारतीय संघात प्रवेश मिळवायचा असेल तर यो-यो टेस्टमध्ये पास होणे गरजेचे आहे. आज (सोमवारी) शामीने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाऊन यो-यो टेस्ट दिली आणि यामध्ये तो पास झाला आहे. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात शामी खेळू शकतो.
... त्यामुळे शामी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हताआयपीएलदरम्यान शामीची यो-यो टेस्ट घेण्यात आली होती. या टेस्टमध्ये शामी नापास झाला होता. त्यामुळेच त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. पण आज पुन्हा एकदा शामीने यो-यो टेस्ट दिली आणि त्यामध्ये तो पास झाला आहे.