Join us  

इंग्लंडला धक्का : मार्क वूड तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर

खांद्याच्या दुखापतीने बेजार. वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली लीड्समध्ये वूड संघासोबत असणार आहे. ३१ वर्षांच्या वूडला उजव्या खांद्याला दुखापत असून वैद्यकीय पथक २९ ऑगस्ट रोजी दुखापतीची समीक्षा करणार आहे. वूडने लॉर्ड्स कसोटीत पाच गडी बाद केले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 5:29 AM

Open in App

लीड्स : पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध यजमान इंग्लंड बुधवारपासूृन हेडिंग्ले मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. मात्र त्याआधीच स्टार गोलंदाज मार्क वूड हा खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. तो तिसरा सामना खेळणार नाही. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना वूडच्या खांद्याला दुखापत झाली होती. 

दरम्यान, वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली लीड्समध्ये वूड संघासोबत असणार आहे. ३१ वर्षांच्या वूडला उजव्या खांद्याला दुखापत असून वैद्यकीय पथक २९ ऑगस्ट रोजी दुखापतीची समीक्षा करणार आहे. वूडने लॉर्ड्स कसोटीत पाच गडी बाद केले होते. 

  टी-२० मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेव्हिड मलानचे कसोटीत पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज साकिब महमूदला संघात स्थान मिळाले असून साकिब  तिसऱ्या कसोटीत खेळू शकतो. डेव्हिड मलानने ऑगस्ट २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५ कसोटी सामन्यांत त्याने २७.८ च्या सरासरीने ७२४ धावा केल्या आहेत. त्यात एका शतकाचा समावेश आहे. दुसरीकडे साकिबने आतापर्यंत एकही कसोटी  खेळलेली नाही. पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने नऊ गडी बाद केले होते. ही मालिका इंग्लंड संघाने ३-० अशी जिंकली होती.

इंग्लंडने संघातून जॅक क्रॉले, डॉम सिबली आणि जॅक लीच यांना आधीच बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आधीच  दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला तर वेगवान जोफ्रा आर्चर हादेखील जखमी आहे. स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याने मानसिक कारणांमुळे अनिश्चित काळासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.लीड्स : पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध यजमान इंग्लंड बुधवारपासूृन हेडिंग्ले मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. मात्र त्याआधीच स्टार गोलंदाज मार्क वूड हा खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. तो तिसरा सामना खेळणार नाही. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना वूडच्या खांद्याला दुखापत झाली होती. दरम्यान, वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली लीड्समध्ये वूड संघासोबत असणार आहे. ३१ वर्षांच्या वूडला उजव्या खांद्याला दुखापत असून वैद्यकीय पथक २९ ऑगस्ट रोजी दुखापतीची समीक्षा करणार आहे. वूडने लॉर्ड्स कसोटीत पाच गडी बाद केले होते. 

  टी-२० मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेव्हिड मलानचे कसोटीत पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज साकिब महमूदला संघात स्थान मिळाले असून साकिब  तिसऱ्या कसोटीत खेळू शकतो. डेव्हिड मलानने ऑगस्ट २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५ कसोटी सामन्यांत त्याने २७.८ च्या सरासरीने ७२४ धावा केल्या आहेत. त्यात एका शतकाचा समावेश आहे. दुसरीकडे साकिबने आतापर्यंत एकही कसोटी  खेळलेली नाही. पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने नऊ गडी बाद केले होते. ही मालिका इंग्लंड संघाने ३-० अशी जिंकली होती.

इंग्लंडने संघातून जॅक क्रॉले, डॉम सिबली आणि जॅक लीच यांना आधीच बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आधीच  दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला तर वेगवान जोफ्रा आर्चर हादेखील जखमी आहे. स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याने मानसिक कारणांमुळे अनिश्चित काळासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.

टॅग्स :इंग्लंड
Open in App