England vs Ireland 1st ODI: 139 दिवसांनंतर आज पहिला आंतरराष्ट्री वन डे सामना इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुरू झाला आहे. जुलै 2019मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच वन डे सामन्यासाठी मैदानावर उतरला. तब्बल 382 दिवसांनी घरच्या मैदानावर वन डे सामन्यात उतरलेल्या इंग्लंडनं दमदार खेळाचे प्रदर्शन घडवलं. डेव्हिड विलीनं आयर्लंडच्या आघाडीच्या फळीला धक्के दिले. त्यामुळे आयर्लंडचा निम्मा संघ अवघ्या 10 षटकांत माघारी परतला. पण, त्यानंतर कर्टीस कॅम्फरनं सहाव्या आणि आठव्या विकेटसाठी अनुक्रमे केव्हिन ओ'ब्रायन आणि अँडी मॅकब्रीन यांच्यासह अर्धशतकी भागीदारी केली. याशिवाय त्यानं एका आगळ्या विक्रमालाही गवसणी घातली.
वाढदिवसानिमित्त सोनू सूदची मोठी घोषणा; 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात 13 मार्चला अखेरचा आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर हा पहिलाच वन डे सामना आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी वर्ल्ड सुपर लीगची (आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग) घोषणा केली. आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका वर्ल्ड सुपर लीगचा शुभारंभ आहे. 1991मध्ये दोन वन डे सामन्यांमध्ये 143 दिवसांचा ब्रेक लागला होता.
हार्दिक पांड्याला पुत्ररत्न; भारतीय क्रिकेटपटूनं शेअर केला फोटो
विलीनं पहिल्याच षटकात आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्ट्रीलिंगला माघारी पाठवले. त्यानंतर एकामागून एक धक्के देत विलीनं आयर्लंडच्या चार फलंदाजांना बाद केलं, साकीब महमूदनं एक विकेट घेत त्याला साथ दिली. विलिनं टाकलेल्या सातव्या षटकात लागोपाठ दोन विकेट घेतल्या, परंतु त्याची हॅटट्रिक हुकली. आयर्लंडच्या 10 षटकांत 5 बाद 33 धावा झाल्या होत्या.
केव्हीन ओ'ब्रायन आणि कर्टीस यांनी सहाव्या 51 धावांची भागीदारी केली. केव्हीन 22 धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेला सिमी सिंगही (0) पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. पण, कर्टीसनं आठव्या विकेटसाठी अँडी मॅकब्रीनसह अर्धशतकी भागीदारी केली. कर्टीसनं अर्धशतक पूर्ण करून एक विक्रम नावावर केला. आयर्लंडकडून वन डे पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी इयॉन मॉर्गननं 2006मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 99 धावा केल्या होत्या. त्यानंतर मॉर्गन आता इंग्लंड संघाचे नेतृत्व सांभाळत आहे. त्याचवर्षी एसी बोथानं इंग्लंडविरुद्घ 52 धावा केल्या होत्या.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
याला काय अर्थ आहे राव! हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; पण मीम्स बनले विराट-अनुष्कावर
आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत!
139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक!
IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का?
तेव्हा 'दैव' टीम इंडियाच्या बाजूनं होतं; आफ्रिदीनं अपयशाचं खापर फोडलं नशिबावर
Bold & Beauty! भारताची पहिली महिला सर्फर इशितानं वेधलं क्रीडा विश्वाचं लक्ष
Web Title: England vs Ireland 1st ODI: Curtis Campher becomes the third Irishman to score a half-century on ODI debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.