England vs Ireland 1st ODI: तब्बल 382 दिवसांनी घरच्या मैदानावर वन डे सामन्यात उतरलेल्या इंग्लंडनं दमदार खेळाचे प्रदर्शन घडवता विजयाची नोंद केली. ICC Men's Cricket World Cup Super League ( आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग) मधील ही पहिलीच मालिका आहे आणि इंग्लंडनं विजयासह खात्यात 10 गुणांची कमाई केली. इंग्लंडच्या डेव्हिड विलीनं आयर्लंडला दे धक्का देताना पाच विकेट्स घेतल्या. आयर्लंडचे 173 धावांचे लक्ष्य इंग्लंडनं 6 विकेट्स राखून पार केले.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात 13 मार्चला अखेरचा आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर हा पहिलाच वन डे सामना आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्ल्ड कप सुपर लीगची (आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग) घोषणा केली. आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका वर्ल्ड कप सुपर लीगचा शुभारंभ आहे. विलीनं पहिल्याच षटकात आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्ट्रीलिंगला माघारी पाठवले. त्यानंतर एकामागून एक धक्के देत विलीनं आयर्लंडच्या चार फलंदाजांना बाद केलं, साकीब महमूदनं एक विकेट घेत त्याला साथ दिली. विलिनं टाकलेल्या सातव्या षटकात लागोपाठ दोन विकेट घेतल्या, परंतु त्याची हॅटट्रिक हुकली. आयर्लंडच्या 10 षटकांत 5 बाद 33 धावा झाल्या होत्या. (ICC Men's Cricket World Cup Super League)
केव्हीन ओ'ब्रायन आणि कर्टीस यांनी सहाव्या 51 धावांची भागीदारी केली. केव्हीन 22 धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेला सिमी सिंगही (0) पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. पण, कर्टीसनं आठव्या विकेटसाठी अँडी मॅकब्रीनसह अर्धशतकी भागीदारी केली. कर्टीस 118 चेंडूंत 4 चौकारासंह 59 धावांवर नाबाद राहिला. आयर्लंडचा संपूर्ण संघ 172 धावांत तंबूत परतला. विलीनं 30 धावांत 5 विकेट्स घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तीक कामगिरी नोंदवली. (ICC Men's Cricket World Cup Super League)
इंग्लंडनं हे लक्ष 27.5 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. सॅम बिलिंगने 54 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 67 धावा केल्या, तर कर्णधार इयॉन बॉर्गननं 40 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 36 धावा केल्या.