आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी वर्ल्ड सुपर लीगची (आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग) घोषणा केली. आयर्लंड आणि वर्ल्ड कप विजेते इंग्लंड यांच्यात ३० जुलैपासून खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट मालिकेने या लीगची सुरुवात होणार आहे. 2023च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीतील ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (ICC World Super League)
भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं गावात उघडलंय कोव्हिड सेंटर; गंभीर, युवीनं केलं सॅल्यूट!
इंग्लंडचा संघ आयर्लंडविरूद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच मालिकेच्या माध्यमातून क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगचा श्रीगणेशा होईल. या लीग अंतर्गत खेळवण्यात येणारे सामने हे २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रता सामने असतील. यजमान भारत आणि सुपर लीगमधील अव्वल सात संघ अशा आठ संघांना वर्ल्ड कप स्पर्धेत थेट स्थान मिळेल. (ICC World Super League)
आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेले १२ संघ आणि विश्व क्रिकेट सुपर लीग २०१५-१७ चे विजेते नेदरलॅन्डस् असे १३ संघ या नव्या सुपर लीगमध्ये स्पर्धेत खेळतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर आणि परदेशात ४-४ वन डे मालिका खेळेल. प्रत्येक वन डे मालिका ही तीन सामन्यांचीच असेल. या स्पर्धेत जे संघ थेट पात्र ठरणार नाही, त्यांना पात्रता फेरी २०२३ मध्ये पाच सहकारी संघांसह खेळून स्थान निश्चित करावे लागेल. यातून दोन संघ निवडले जातील आणि भारतात १० संघांमध्ये मूळ विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल. (ICC World Super League)
- इंग्लंड-आयर्लंड वन डे मालिकेचे वेळापत्रक
30 जुलै - पहिला वन डे- साऊदॅम्प्टन01 ऑगस्ट - दुसरा वन डे - साऊदॅम्प्टन04 ऑगस्ट - तिसरा वन डे - साऊदॅम्प्टन
- सामन्याची वेळ - सायंकाळी 6.30 वाजल्यापासून
- थेट प्रक्षेपण - सोनी सिक्स, सोनी सिक्स एचडी, सोनी LIV अॅप
- संभाव्य संघ
इंग्लंड - जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जेम व्हिन्स, इयॉन मॉर्गन ( कर्णधार), सॅम बिलिंग, टॉम बँटन, मोईन अली, डेव्हिड विली, टॉम कुरन, आदील रशीद, सकीब महमूद
आयर्लंड - पॉल स्टीर्लिंग, जेम्स मॅककोलम, अँण्ड्य्रू बॅल्बीर्नीए ( कर्णधार), विलियम पोटरफिल्ड, गॅरी विलसन, केव्ही ओब्रायन, अँड्य्रू मॅकब्रिन, बॅरी मॅककार्थी, जॉर्ज डॉकरेल, टीम मुर्ताघ, बॉयड रॅनकीन
अन्य महत्त्वाच्या बातम्या
'उल्टा चष्मा'मधल्या जेठालालची 'बबिता' होती पाकिस्तानी खेळाडूच्या प्रेमात!
KKRला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; प्रथम श्रेणीत 6482 धावा अन् 137 विकेट्स!
शॉक लगा... पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत घेतला सेल्फी, नंतर माहीत पडलं त्याला कोरोना झालाय!
एलिसा पेरीनं घेतला घटस्फोट, पण ट्रोल होतोय मुरली विजय; जाणून घ्या कारण!
IPL 2020: 125 भारतीय खेळाडू कमावणार 358 कोटी, तर 62 परदेशी खेळाडूंना मिळणार 197 कोटी!