Join us  

T20 World Cup, ENG vs NZ Semi Final Updates : न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सचे खेळाप्रती समर्पण पाहा, धावा अडवण्यासाठी लावली जीवाची बाजी, Video

T20 World Cup, ENG vs NZ : न्यूझीलंडनं २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाचा वचपा काढला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 12:20 AM

Open in App

T20 World Cup, ENG vs NZ Semi Final Updates : न्यूझीलंडनं २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाचा वचपा काढला. उपांत्य फेरीच्या या सामन्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. किवींचे दोन प्रमुख फलंदाज अवघ्या १३ धावांवर माघारी परतले, त्यानंतर १६व्या षटकांपर्यंत इंग्लंडनं सामन्यावर मजबूत पकड घेतली होती. पण, जिमि निशॅमनं १७व्या षटकात ख्रिस जॉर्डनला २६ धावा चोपल्या आणि दडपड कमी केलं. १८व्या षटकात विजयासाठी २० धावा हव्या असताना निशॅम झेलबाद झाला अन् इंग्लंडचे चाहते खूश झाले. पण, अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरील मिचेलनं सामना संपवला. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातही स्वत:ला १०० टक्के झोकून दिल्याचं पाहायला मिळालं.

कर्णधार विलियमसननं बेयरस्टोचा जबरदस्त झेल घेतला, तर दुसरीकडे ग्लेन फिलिप्सनं (Glenn Phillips) मैदानावर चौकार रोखण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. आयसीसीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान १० व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवरील फिलिप्सच्या क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. डेव्हिड मलाननं जेम्स निशमच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेनं जबरदस्त शॉट मारला, जो बाऊंड्रीच्या दिशेने जात होता. त्यावेळी फिलिप्सनं तो रोखण्यासाठी वेगानं त्या दिशेने धाव घेतली.

त्या चौकार वाचवता आला नाही. परंतु चौकार वाचवण्यासाठी त्यानं जो प्रयत्न केला त्यामुळे तो बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि कॅमेरामनच्या जवळ पडला. भलेही त्याला यात दुखापत झाली नाही, परंतु मोठी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. नेटकऱ्यांनीही फिलिप्सच्या या क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं आहे. 
टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१न्यूझीलंडइंग्लंड
Open in App