England Vs New Zealand World Cup Final : अन् इंग्लंडच्या जेसन रॉयनं पंच कुमार धर्मसेनाला मारली मिठी, कारण...

England Vs New Zealand World Cup Final : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात मैदानावर पंच म्हणून कुमार धर्मसेना आणि मॅरेस इरास्मस ही जबाबदारी पार पाडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 04:10 PM2019-07-14T16:10:14+5:302019-07-14T16:10:33+5:30

whatsapp join usJoin us
England Vs New Zealand World Cup Final : Jason Roy has an embrace with umpire kumar dharmasena before the start of play | England Vs New Zealand World Cup Final : अन् इंग्लंडच्या जेसन रॉयनं पंच कुमार धर्मसेनाला मारली मिठी, कारण...

England Vs New Zealand World Cup Final : अन् इंग्लंडच्या जेसन रॉयनं पंच कुमार धर्मसेनाला मारली मिठी, कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात मैदानावर पंच म्हणून कुमार धर्मसेना आणि मॅरेस इरास्मस ही जबाबदारी पार पाडत आहेत. या सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉय आणि धर्मसेना बराचवेळ एकमेकांशी चर्चा करत होते. रॉयनं तर चक्क धर्मसेनाला घट्ट मिठी मारलेली पाहायला मिळाले. पण, रॉयनं असं का केलं?

रॉय आणि धर्मसेना यांच्यातल्या आजच्या दिलजमाईमागे उपांत्य फेरीतील सामन्याचा एक प्रसंग कारणीभूत आहे.  यजमान इंग्लंडने 1992 नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे 224 धावांचे लक्ष्य 32.1 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. या सामन्यातील रॉय हा स्टार खेळाडू ठरला. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करून 65 चेंडूंत 85 धावा केल्या. त्यात 9 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर जो रूट ( 49*) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन ( 45*) यांनी इंग्लंडचा विजय निश्चित केला. रॉयनं सलामीवीर जॉनी बेअरस्टो यांच्यासह 124 धावांची भागीदारी केली.  

पण, या सामन्यातील 20 व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीनं बाद देण्यात आले. चेंडू व्हाईडच्या दिशेनं गेला होता, त्यावर रॉयनं फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, बॅट आणि चेंडू यांच्यात काहीच संपर्क झाला नाही, तरीही ऑसी खेळाडूंनी अपील केलं. बऱ्याच वेळ अपील केल्यानंतर पंच कुमार धर्मसेनानं त्याला बाद ठरवले. त्यानंतर रॉयनं तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. या प्रकरणी आयसीसीनं रॉयला मॅच फीमधील 30 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याची शिक्षा सुनावली. 

पण, अंतिम सामन्यापूर्वी रॉयनं पंच धर्मसेना यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माफी मागितली.


Web Title: England Vs New Zealand World Cup Final : Jason Roy has an embrace with umpire kumar dharmasena before the start of play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.