लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना जेतेपद पटकावून इतिहास घडविण्याची संधी आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही आणि आजचा विजेता हा क्रिकेटला लाभलेला नवा जेता ठरणार आहे. त्यामुळे आज कोण जिंकणार? कोणाचे पारडे जड असणार? हा चर्चा होणे साहजिकच आहे. इंग्लंडने स्पर्धेत दमदार पुनरागमन करून अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे आणि 1992नंतर प्रथमच ते जेतेपदाच्या लढतीसाठी खेळणार आहेत.
इंग्लंडने 1966 ला फिफा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला; पण क्रिकेटमध्ये त्यांची झोळी रिकामीच आहे. महिला फुटबॉल संघालादेखील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाचा प्रवास चढ-उताराचा राहिला. तरीही हा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पुढे आला आहे. फायनलसाठी सर्व रस्ते क्रिकेट मैदानाकडे वळतील, अशी स्थिती आहे. देशात पहिल्यांदा फुटबॉलची नव्हे, तर क्रिकेटची चर्चा होत आहे.
हवामानाचा अंदाज काय?संपूर्ण स्पर्धेत हवामान हा महत्त्वाचा विषय ठरला आहे. त्यामुळे आज लॉर्ड्सवर होणाऱ्या सामन्यातही या गोष्टीवर चर्चा सुरू आहे. पण, आजच्या सामन्यात पावसाची शक्यता फार कमीच आहे. येथील तापमान 14 ते 20 डीग्री सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.
खेळपट्टीचा अंदाज काय?
उभय संघ यातून निवडणारइंग्लंड : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरेस्टो, जॉस बटलर, टॉम कुरन, लियॉम डॉसन, लियाम प्लंकेट, आदील राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स,जेम्स व्हिन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
न्यूझीलंड : केन विलियम्सन(कर्णधार), मार्टिन गुप्तिल, कॉलिन मुन्रो, रॉस टेलर, टॉम लाथम, टॉम ब्लंडेल, कॉलिन डे ग्रॅन्डहोमे, जिम्मी नीशॅम, ट्रेंट बोल्ट, ल्युकी फग्युर्सन, मॅट हेन्री, मिशेल सँटनर, हेन्री निकोल्स, टीम साऊदी आणि ईश सोढी.