Join us  

England vs Pakistan, 3rd Test: 92 वर्षांत इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम झॅक क्रॅवलीनं केला!

England vs Pakistan, 3rd Test:पाकिस्तानच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना 92 वर्षांत इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम करून दाखवला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 9:03 PM

Open in App

England vs Pakistan, 3rd Test: मालिकेत 1-0 अशा आघाडीवर असलेल्या इंग्लंड संघानं तिसऱ्या व शेवटच्या कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. रोरी बर्न्स आणि डॉम सिब्ली हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर झॅक क्रॅवली आणि जोस बटलर यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे उपटली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी तीनशेहून अधिक धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ गाजवल्यानंतर झॅकने दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण केलं. त्यानं पाकिस्तानच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना 92 वर्षांत इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम करून दाखवला. 

शाब्बास झॅक; इंग्लंडच्या 22 वर्षीय फलंदाजानं मोडला 82 वर्षांपूर्वीचा विक्रम 

कर्णधार जो रूट ( 29) आणि ओली पोप ( 3) यांनाही छाप पाडता आली नाही. झॅक आणि बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला. झॅक 309 चेंडूंत 21 चौकारांच्या मदतीनं 182 धावांवर खेळत आहे. बटलरनं 199 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह 107 धावा केल्या आहेत. 99 धावांवर असताना मोहम्मद अब्बासच्या गोलंदाजीवर पचांनी त्याला झेलबाद दिले. पण, बटलरनं लगेच DRS घेतला आणि पंचांचा निर्णय चूकीचा ठरला. पुढच्याच चेंडूवर बटलरनं शतकी धाव घेतली. 

बटलरच्या शतकानंतर झॅक अॅक्शन मोडमध्ये आला. त्यानं 335 चेंडूंत द्विशतक पूर्ण केलं. त्यात 26 चौकारांचा समावेश आहे. इंग्लंडकडून द्विशतक झळकावणारा तो तिसरा युवा फलंदाज ठरला. त्यानं 22 वर्ष  201 दिवसांत ही कामगिरी केली. यासह त्यानं 1938/39 साली बिल एडरीच यांचा ( 22 वर्ष व 352 दिवस)  विक्रम मोडला. या विक्रमात पहिल्या दोन स्थानी लेन हटन ( 22 वर्ष व 60 दिवस) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1938मध्ये 364 धावा, तर डेव्हीड गोवर ( 22 वर्ष व 103 दिवस ) यांनी भारताविरुद्ध 1979मध्ये नाबाद 200 केल्या होत्या.  या सामन्यापूर्वी झॅकनं 11 कसोटी डावांत 314 धावा केल्या होत्या आणि आज त्यानं पाकिस्तानविरुद्ध 250 धावांचा पल्ला पार केला.   इंग्लंडकडून पहिले कसोटी शतक झळकावताना झॅकनं 92 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. त्यानं 393 चेंडूंत 34 चौकार व 1 षटकारासह 267 धावा केल्या. या कामगिरीसह त्यानं वॅली हॅमोंड यांनी 1928साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवलेला 251 धावांचा विक्रम मोडला. या विक्रमात अव्वल स्थानी टीम फोस्टर आहेत. त्यांनी 1903साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 287 धावा केल्या होत्या.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन

Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा?

 99वर असताना पंचांनी दिलं बाद, तरीही जोस बटलरनं झळकावलं शतक; पाहा नेमकं काय घडलं

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तान