कोरोनाच्या संकटात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिज संघानं विजयाचा मान पटकावला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले 200 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजनं 4 विकेट्स राखून सहज पार केले. जेरमेन ब्लॅकवूड ( 95) हा या विजयाचा शिल्पकार ठरला. इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसननं या सामन्यात एक मोठी चूक केली आणि त्याची ही चूक कॅमेरात कैद झाली. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषद ( आयसीसी) त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. England vs West Indies, 1st Test
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, विंडीज गोलंदाजांसमोर त्यांच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली. विंडीज कर्णधार जेसन होल्डर आणि शेनॉन गॅब्रीएल यांनी अनुक्रमे 6 व 4 विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांत गुंडाळला. बेन स्टोक्स ( 43) आणि जोस बटलर ( 35) यांनी संघर्ष केला. वेस्ट इंडिजनं प्रत्युत्तरात 318 धावा करताना 114 धावांची आघाडी घेतली. क्रेग ब्रेथवेट ( 65), शेन डॉवरीच ( 61) आणि रोस्टन चेस ( 47) यांनी दमदार खेळ केला. बेन स्टोक्सनं या सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याला जेम्स अँडरसननं तीन विकेट घेत चांगली साथ दिली.
इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली. रोरी बर्न्स ( 42) आणि डॉम सिब्ली ( 50) यांनी दमदार सुरुवात करून दिली. झॅक क्रॅवली ( 76) आणि कर्णधार बेन स्टोक्स (46) यांनी संघर्ष केला, परंतु विंडीजच्या गोलंदाजांनी यजमानांना झटके दिले. इंग्लंडचा दुसरा डाव 313 धावांत गुंडाळला. शॅनोन गॅब्रीएलनं 5 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात निराशाजनक झाली. पण, ब्लॅकवूडनं एकाकी खिंड लढवून विंडीजचा विजय पक्का केला. विंडीजनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. England vs West Indies, 1st Test
या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनकडू एक मोठी चूक झाली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीनं काही नियमांत बदल केले आहेत. त्यात चेंडू चमकावण्यासाठी लाळ किंवा घामाचा वापर करू नये, हा प्रमुख नियम आहे. पण, अँडरसनं दुसऱ्या डावात चेंडूला घाम लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. England vs West Indies, 1st Test
Web Title: England vs West Indies, 1st Test : James Anderson used saliva to shine the ball just before the 1st wicket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.