कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला लागलेला ब्रेक आज दूर होणार आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला कसोटी सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. त्यामुळे सर्वांना त्याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #ENGvWI हा ट्रेंड सुरू आहे. पण, आता चाहत्यांना केदार जाधवची आठवण येऊ लागली आहे, पण का?
कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेटमध्ये बदल; जाणून घ्या नव्या नियमांबद्दल
... तर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो लावून मैदानावर उतरणार पाकिस्तानचा संघ!
मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा झालेल्याच नाहीत. त्यामुळे इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. वेस्ट इंडिजचा संघ 15-20 दिवसांपूर्वीच येथे दाखल झाला असून त्यांनी 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर सरावही केला. इंग्लंडच्या खेळाडूंनीही तीन दिवसांचा सराव सामना खेळला आहे. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा एकदा मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आतूर आहेत. पण, पावसामुळे सामना सुरू होण्यास विलंब होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजल्यापासून हा कसोटी सामना सुरू होणार होता. पण, पावसामुळे अजून नाणेफेकही झालेली नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
64 वर्ष जुन्या महालात राहतो 'बंगाल टायगर'; पाहूया सौरव गांगुलीच्या महालाचे Unseen फोटो!
भारतीय क्रिकेटपटूंचा अॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा
वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!
'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...!
Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत
टीम इंडियाचा फलंदाज 'डोसा' घेऊन पोहोचला विराट कोहलीच्या घरी, अन्...