बुधवारपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा झाला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कालपासून सुरू झाला. पावसानं पहिल्या दिवसाच्या खेळावर पाणी फिरवले असले तरी क्रिकेटच्या पुनरागमनानं सर्व सुखावले आहेत. कोरोन व्हायरसच्या संकटात नव्या नियमांसह क्रिकेटला सुरुवात झाली आहे. हे नवे नियम अंगवळणी पडण्यासाठी वेळ लागेल, पण त्याचं काटेकोर पालन करणं हे सर्वांच्या हिताचं आहे. पण, वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याच्याकडून पहिल्याच दिवशी चूक झाली आणि तो महत्त्वाचा नियम विसरला.
इंग्लंड कर्णधाराच्या जर्सीवर 'विकास कुमार' असे नाव; जाणून घ्या कारण
इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ 17.4 षटकांचा खेळ झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ली ( 0) याला खातेही खोलू न देता शेनॉन गॅब्रीयल यानं त्रिफळाचीत करून माघारी पाठवले. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना थांबवण्यात आला आणि इंग्लंडने पहिल्या दिवशी 1 बाद 35 धावा केल्या. रोरी बर्न्स ( 20) आणि जो डेन्ली ( 14) नाबाद आहेत.
मानलं भावा; एक पाय नसतानाही करतोय लै भारी फलंदाजी; 50 हजारवेळा पाहिला गेलाय Video
कोरोना व्हायरसच्या संकटात सुरू झालेल्या या सामन्यात चेंडू चमकावण्यासाठी थूंकीचा वापर न करणे, हस्तांदोलन न करणे असे काही नियम आयसीसीनं आखले आहेत. पण, यापैकी एक नियम होल्डर विसरला. त्यानंतर समालोचकानं स्टोक्सला सँनिटायझरनं हात धुण्यास सांगितले. नाणेफेकीचा कौल स्टोक्सच्या बाजूनं लागला त्यानंतर होल्डरनं सवईप्रमाणे त्यानं हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. स्टोक्सनं लगेचच त्याचा हात मागे घेतला आणि होल्डरलाही त्याची चूक कळली.
पाहा व्हिडीओ...
काय आहेत नवे नियम?
- कोरोना व्हायरसचा बदली खेळाडू - कसोटी सामन्यात एखाद्या खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्याच्या जागी आता संघाला बदली खेळाडू खेळवता येईल. बदली खेळाडूला सामनाधिकारी मंजूरी देतील. पण, हा नियम वन डे आणि ट्वेंटी-20 सामन्यांसाठी लागू नसेल.
- थुंकी किंवा घामाच्या वापरावर बंदी - चेंडू चमकावण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. चेंडूबाबतचा निर्णय पंच घेतील. नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास खेळाडूंना वॉर्निंग दिली जाईल. दोन वेळा वॉर्निंग देऊनही खेळाडूंनी न ऐकल्यास संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येत पाच धावा जोडल्या जातील.
- तटस्थ पंच नसेल - कोरोना व्हायरसमुळे आलेल्या बंधनामुळे सध्यातरी स्थानिक पंचांची सामन्यासाठी नियुक्ती केली जाईल.
- अतिरिक्त DRS - प्रत्येक संघाला प्रत्येक डावासाठी अतिरिक्त DRS दिला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात प्रती डावासाठी तीन,तर मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी दोन DRS घेता येणार आहेत.
- प्रेक्षकांना नो एन्ट्री - कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे रिकाम्या स्टेडियमवर म्हणजेच प्रेक्षकांविना क्रिकेट सामना खेळवण्यात येणार आहे.
- अतिरिक्त लोगो - आयसीसीनं पुढील 12 महिन्यांपर्यंत अतिरिक्त लोगो वापरण्यास परवानगी दिली आहे. आता जर्सीवर चार लोगो वापरता येतील.