इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 312 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सनं दुसऱ्या डावात तुफान फटकेबाजी केली. त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं विंडीजसमोर अखेरच्या दिवशी 312 धावांचे आव्हान उभे केले. इंग्लंडने दुसरा डाव 3 बाद 129 धावांवर घोषित केला. इंग्लंडने हा सामना जिंकून मालिका १-१ अशा बरोबरीत आणली. स्टोक्सने पहिल्या डावात १७६ आणि दुसऱ्या डावात नाबाद ७८ धावा करताना विजयात सिंहाचा वाटा उचलला. England vs West Indies 2nd Test
इंग्लंडनं पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केला होता, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 287 धावांवर गडगडला. विंडीजनं फॉलोऑन टाळले तरी स्टोक्सच्या फटकेबाजीनं त्यांच्यावरील पराभवाचं संकट वाढवलं आहे. विंडीजकडून क्रेग ब्रॅथवेट ( 75), शॅमार्ह ब्रुक्स ( 68) आणि रोस्टन चेस ( 51) यांनी अर्धशतकी खेळी केली.
इंग्लंडनं दुसऱ्या डावात स्टोक्सला सलामीला पाठवलं आणि त्यानं 57 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 78 धावा चोपल्या. इंग्लंडच्या ३११ धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजला स्टुअर्ट ब्रॉडने सुरुवातीलाच तीन धक्के दिले. शॅमार्ह ब्रूक्स ( ६२) आणि जेर्मेन ब्लॅकवूड (५५) यांनी इंग्लंडचा विजय लांबवला. कर्णधार जेसन होल्डरनेहेव (३५) चिवट खेळी करून विंडीजचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केले. पण, इंग्लंडने विंडीजचा डाव 198 धावांवर गुंडाळून दुसरी कसोटी जिंकली. England vs West Indies 2nd Test